मराठी बातम्या  /  Sports  /  Asia Cup Ind Vs Pak Team India 5 Records Pakistan Not Break Know More Details

IND vs PAK: टीम इंडियाचे 'हे' पाच रेकॉर्ड...जे पाकिस्तान स्वप्नातही मोडू शकत नाही!

IND vs PAK
IND vs PAK
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Aug 20, 2022 04:40 PM IST

Asia Cup 2022: एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचे पारडे जड आहे. भारताने टी-२० मध्ये ८ पैकी ६ सामने जिंकले आहेत.

या महिन्याच्या अखेरीस आशिया चषक सुरु होणार आहे. तर २८ ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. राजकीय ताण तणावामुळे दोन्ही देशांनी जानेवारी २०१२  पासून एकमेकांसोबत द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. अशा परिस्थितीत दोन्ही देशांचे खेळाडू केवळ आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धांमध्येच मैदानात भिडताना दिसतात.

ट्रेंडिंग न्यूज

एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचे पारडे जड आहे. भारताने टी-२० मध्ये ८ पैकी ६ सामने जिंकले आहेत. क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अनेक विक्रम केले आहेत. यावेळी आपण भारतीय संघाच्या अशा विक्रमांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तोडणे पाकिस्तानसाठी खूप कठीण आहे.

T20 मध्ये सर्वाधिकवेळा २०० पेक्षा अधिक धावा- टीम इंडियाने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा २०० किंवा त्याहून अधिक स्कोर केला आहे. भारताने २१ वेळा २०० धावांचा टप्पा गाठला आहे. तर पाकिस्तानी संघ केवळ १० वेळा हा टप्पा पार करू शकला आहे. 

मायदेशात सर्वाधिक कसोटीत विजय: भारताने आतापर्यंत घरच्या मैदानावर ११२ कसोटी सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तान संघाने घरच्या मैदानावर ६० कसोटी सामने जिंकले आहेत. २०१२-१३ च्या मोसमात, टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध १-२ अशा पराभवानंतर घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. दुसरीकडे, यावर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता.

विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सातत्यपूर्ण विजय : विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा दबदबा सर्वश्रुत आहे. भारताचा वर्ल्डकपमधील सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध १२-१ (७ एकदिवसीय आणि ५ T20 विश्वचषक) असा विक्रम आहे. गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताविरुद्ध वर्ल्डकपच्या इतिहासातला पहिला विजय मिळवला होता. वपाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध पहिला विजय मिळवण्यासाठी २९ वर्षे वाट पाहावी लागली. मात्र, एकदिवसीय विश्वचषकात भारत पाकिस्तानकडून एकदाही हरवता आलेले नाही.

ऑस्ट्रेलियात सलग दोन कसोटी मालिका जिंकणे: ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर कसोटी मालिकेत पराभूत करणारा टीम इंडिया हा एकमेव आशियाई संघ आहे. भारताने हा पराक्रम सलग दोनदा केला आहे. सर्वप्रथम, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१८-१९ च्या मालिकेत भारताने मालिका जिंकली होती. त्यानंतर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे ब्रिगेडने २०२०-२१ मध्ये कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर ते ऑस्ट्रेलियात एकदाही कसोटी मालिका जिंकू शकलेले नाही.

नॉकआऊट सामन्यांमध्ये भारताचे वर्चस्व: आयसीसी स्पर्धेच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये भारत हा सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. २०११ च्या विश्वचषकापासून भारत प्रत्येक आयसीसी एकदिवसीय स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ICC ODI फॉरमॅटमध्ये २६ बाद फेरीचे (नॉकआऊट) सामने खेळले आहेत. तर पाकिस्तानने १८ सामने खेळले आहेत.

WhatsApp channel