निज श्रावण महिना सुरु आहे. अशात या महिन्यात भगवान शिवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या काळात भगवान शिव पृथ्वीवर येत असल्याने त्यांना खूष करण्याची एकही संधी शिवभक्त सोडत नाहीत. समुद्र मंथनावेळेस भगवान शिवाने हलाहल म्हणजेच विष प्राशन केलं होतं. त्यानंतर भगवान शिवाचं नाव नीलकंठ असं पडलं होतं.
भगवान शिवाचा निळा रंग एका पक्ष्याच्या रंगाशीही मेळ खातो. श्रावणात हा पक्षी पाहायला मिळाल्यास आयुष्यात काहीतरी शुभ होणार आहे असा त्याचा अर्थ समजला जातो. या पक्ष्याला नीलकंठ याच नावाने ओळखलं जातं.
या पक्ष्याचा निळा रंग भगवान शिवाच्या निळ्या रंगाशी साधर्म्य पावत असल्याने याला पाहाणं अत्यंत शुभ मानलं जातं.
श्रावण काळात जर तुम्हाला हा पक्षी दिसला तर त्या पक्ष्याचं दिसणं तुमच्या आयुष्यात बदलाचे लक्षण मानले जातात. या पक्ष्याच्या दर्शानाने तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचे संकेत हा पक्षी देतो. .याशिवाय काहीतरी चांगली बातमी कानी येऊ शकते असाही त्याचा अर्थ होतो.
श्रावण काळात नीळकंठ पक्षी दिसणे हे अनेक वेळा शुभ मानले जाते. असे मानले जाते की श्रावणामध्ये कोणताही पक्षी दिसणे हे भगवान शिवाचे आशीर्वाद आणि संरक्षण दर्शवते.
अनेकजण नीलकंठ पक्ष्याचे दिसणे हे त्यांच्या जीवनातील सकारात्मक बदलाचे लक्षण मानतात. ज्याप्रमाणे भगवान शिवाने समुद्रमंथनादरम्यान बाहेर पडलेले विष सृष्टीच्या कल्याणाकरिता प्राशन केलं होतं. त्याच प्रमाणे नीलकंठ पक्ष्याचं दर्शन तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल आणि वाढीच्या संभाव्यतेचं प्रतीक मानलं जातं.
नीलकंठ पक्ष्याचा चमकदार निळा रंग भगवान शिवाच्या मानेशी संबंधित आहे, जो दैवी आणि नैसर्गिक जगामधील संबंध वाढवतो. हा पक्षी पाहिल्याने व्यक्तींना सर्व गोष्टींबद्दल सकारात्मकता दर्शवते असा समज आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या