मराठी बातम्या  /  धर्म  /  Chaitra Navratri 2023 : असं कराल चैत्र नवरात्रीचं कन्या भोजन

Chaitra Navratri 2023 : असं कराल चैत्र नवरात्रीचं कन्या भोजन

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 25, 2023 09:11 AM IST

Kumarika Bhojan On Chaitra Navratri : भलेही कुमारिका भोजन अत्यंत पवित्र मानलं जातं. मात्र कुमारीकांना भोजनाला आमंत्रण दिल्यावर कोणत्या गोष्टी करू नये याची माहिती आज आपण घेणार आहोत.

चैत्र नवरात्रीला कन्या भोजनाच्या वेळेस अशी घ्याल काळजी
चैत्र नवरात्रीला कन्या भोजनाच्या वेळेस अशी घ्याल काळजी (हिंदुस्तान टाइम्स)

चैत्र नवरात्रीत आपण दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा करत आहोत. नवरात्रीच्या अष्टमी म्हणजेच आठव्या किंवा नवव्या दिवशी आपण कन्या भोजन सोहळा करतो. यावेळेस किमान ९ कुमारिकांना आपण घरी बोलावतो ाणि त्यांना आदरपूर्वक जेवायला घालतो. असं केल्याने दुर्गा माता आपल्यावर प्रसन्न राहाते असं मानलं जातं. ही परंपरा आपल्याकडे गेली कित्येक दशकं अव्याहत सुरू आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

भलेही कुमारिका भोजन अत्यंत पवित्र मानलं जातं. मात्र कुमारीकांना भोजनाला आमंत्रण दिल्यावर कोणत्या गोष्टी करू नये याची माहिती आज आपण घेणार आहोत.

कुमारीका घरी आल्यावर कोणत्या गोष्टी टाळाव्यात 

मुली घरी आल्यानंतर त्यांना थेट जेवायला बसवू नका, आधी त्यांचे पाय धुवा आणि हळद, कुंकू आणि अक्षता पायांवर अर्पण करून त्यावर स्वस्तिक काढावं.

त्यानंतर या मुलींना पूर्व दिशेला तोंड करून स्वच्छ आसनावर बसवावे. 

मुलींना खीर, पुरी, भाजी आणि इतर गोष्टी प्रेमाने वाढाव्यात.

मुलींना खायला बळजबरी करू नये, त्यांना जमेल तितके सन्मानपूर्वक खाऊ द्यावे हे कायम लक्षात ठेवावे.

कुमारीकांचं जेवण झाल्यावर काय करावे

जेवण झाल्यानंतर या मुलींचे पाय पुन्हा एकदा धुवा

या कुमारीकांना काही वस्तू त्यांना भेट म्हणून द्या.

यामध्ये तुम्ही फळे, नाणी, लाल ओढणी, मिठाई किंवा एखादं भांडं देऊ शकता. 

तुमची क्षमता नसल्यास तुम्हा यापैकी एखादी गोष्टही देऊ शकता.

यानंतर त्यांच्या पायाला हात लावून त्यांचा नमस्कार करा

आणि त्यांना आदरपूर्वक निरोप द्या.

चैत्र नवरात्रीचं कन्यापूजन कधी होईल.

नवरात्र अष्टमी किंवा नवमी कोणत्याही दिवशी आपण कन्यापूजन करू शकतो. कन्या पूजन करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे या दोनही दिवशी कन्यापूजन केलं जातं. कन्यापूजन करणं म्हणजे देवी दुर्गेचं पूजन करण्यासारखं आहे असंही काही ठिकाणी समजलं जातं.

WhatsApp channel

विभाग