तांडव-नृत्य 'शिव तांडव स्तोत्रम्' हे एक हजार आठ श्लोकांवर आधारित आहे, जे सनातन धर्माच्या दैवी स्तोत्रांपैकी एक आहे. हे स्तोत्र शिवाचे सामर्थ्य आणि महानता दर्शवते. हे स्तोत्र पराक्रमी रावण आणि भगवान शिवाचे भक्त आणि उपासक यांच्यातील संबंधाचा पुरावा आहे, कारण रावणाने स्वतः शिव तांडव स्तोत्राची रचना केली आहे.
महादेवांचा परमप्रिय भक्त म्हणून रावणाकडे पाहिलं जातं. रावणाला सर्व विद्या,कला अत्यंत उत्तम येत होत्या किंवा रावण त्यात निष्णात होता.मात्र रावणाला अहंकाराची बाधा झाली होती. शिवशंकराचा परम भक्त असल्याने त्याला आपण काहीही करू शकतो असं वाटत होतं.
एकदा नारद रावणाकडे आले. नारद हेही सर्व विद्या जाणणारे म्हणून ओळखले जातात. दोघांमध्ये काही विषयांवर चर्चा सुरू होती. इतक्यात रावणाचा गर्व जागा झाला आणि त्य़ाने नारदांशी वाद घालायला सुरूवात केली. नारदांनी त्याला “इतका गर्व असेल तर भगवान शिवाला इथं घेऊन ये”, असं आव्हान दिलं.
मग काय रावणच तो. त्यानं कैलासावर चढाई करण्याचा निश्चय केला. तो पर्वत चढत असल्याचं पाहून माता पार्वतीला राग आला आणि तिनं शिवाला इथं तिसऱ्याला स्थान नाही असं सांगितलं. भगवान शंकराने आपल्या पायाच्या अंगठ्याने हिमालयाला दाबलं आणि रावण बर्फात अडकला.
आपण अडकले गेलो आहोत हे पाहून रावणाने शिवशंकराचा धावा सुरू केला. मात्र शंकराला त्याची पर्वा नव्हती. शेवटी रावणानं अहंकार गाळून भगवान शिवशंकराच्या प्रदोषाच्या दिवशी तब्बल एक हजार आठ छंद रचले आणि त्याचं गायन केलं.
हेच छंद पुढे शिव तांडव स्तोत्र म्हणून प्रसिद्ध झाले. भगवान शिवानेही रावणाच्या मुखी हे छंद ऐकले आणि ते प्रसन्न झाले. त्यांनी माता पार्वतीकडे पाहिलं. त्यांनी रावणाला बर्फातून मुक्त करण्याची विनंती शंकराला केली आणि शंकराने रावणाला बर्फातून मुक्त केलं आणि त्याला काही वरदानही दिलं.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या