मराठी बातम्या  /  धर्म  /  Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करू शकत नसाल, तर खरेदी करा ‘या’ गोष्टी

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करू शकत नसाल, तर खरेदी करा ‘या’ गोष्टी

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Apr 10, 2023 11:41 AM IST

Things To Buy On Akshaya Tritiya : परिस्थिती नसल्यास सोनं भलेही तुम्हाला खरेदी करता येत नसेल, मात्र काही गोष्टी अशाही आहेत, ज्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पुरेशा आहेत आणि या दिवशी या वस्तूही तुम्ही खरेदी करू शकता.

अक्षय्य तृतीयेला खरेदी करा या गोष्टी
अक्षय्य तृतीयेला खरेदी करा या गोष्टी (लाइव्ह हिंदुस्तान)

आपल्या जीवनात देवाच्या कृपादृष्टीचा कोणताही क्षय पडू नये आणि आपल्यावर देवाची मर्जी अखंड, अक्षय्य राहावी यासाठी साजरी केली जाते ती अक्षय्य तृतीया. यंदा अक्षय्य तृतीया २२ एप्रिल २०२३ रोजी आनंदात साजरी केली जाईल. यादिवशी केलेलं दान किंवा केलेली खरेदी अक्षय्य टिकते असं पुराणग्रंथात सांगितलं गेल्यामुळे, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय्य तृतीयेला दान आणि खरेदीची मोठी परंपरा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अक्षय्य तृतीयेला सोन चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. ही खरेदी घराची भरभराट करणारी असल्याने सोन्याच्या दुकानांत मोठ्या रांगा पाहायला मिळतात. मात्र परिस्थिती नसेल तर सोनं खरेदीपासून काहीजणं मुकू शकतात. अशा लोकांनाही काळजी करण्याचं कारण नाही. कारण, सोनं भलेही तुम्हाला खरेदी करता येत नसेल, मात्र काही गोष्टी अशाही आहेत, ज्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पुरेशा आहेत आणि या दिवशी या वस्तूही तुम्ही खरेदी करू शकता. कोणत्या गोष्टी खरेदी केल्या जाऊ शकतात हे सांगण्यााधी एक नजर टाकूया अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तांवर.

अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त कोणते?

अक्षय्य तृतीया तिथी शनिवार, २२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०७.४८ वाजता सुरू होईल आणि २३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०७.४५ वाजता समाप्त होईल. त्याचप्रमाणे हिंदू कॅलेंडरनुसार या दिवशी चंद्र वृषभ राशीमध्ये उच्च असेल. यासोबतच अक्षय्य तृतीयेला ७ शुभ योग तयार होत असून त्यापैकी आयुष्मान योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, अमृत सिद्धी योग आणि त्रिपुष्कर योग, कृतिका नक्षत्र यांचा समावेश आहे.

अक्षय्य तृतीयेला या गोष्टींची केली जाऊ शकते खरेदी

पारद शिवलिंग

पारद शिवलिंग घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर पारद शिवलिंग अवश्य घेऊन या आणि त्याची विधीपूर्वक पूजा करा. पारद शिवलिंगाचे पूजन केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो, पारद शिवलिंग घरात ठेवल्याने लक्ष्मी आणि देव कुबेर यांचा घरात कायम वास होतो.

दक्षिणावर्ती शंख

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी आणावा. दक्षिणावर्ती शंखाची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि दक्षिणावर्ती शंख घरात ठेवल्याने लक्ष्मीचा वासही होतो अशी मान्यता आहे.

एकाक्षी नारळ

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात एकाक्षी नारळ अवश्य आणा. मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीची कृपा अशा लोकांवर सदैव राहते ज्यांच्याकडे एकाक्षी नारळ असतो आणि त्यांच्या जीवनात कोणतीही आर्थिक समस्या डोकावत नाही.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग