Mangalwar Upay : नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें, मंगळवारी करा मारुतीरायाचं स्मरण
Problems & Solutions For Tuesday : मंगळवार हा मारुतीला समर्पित वार आहे. या दिवशी तुम्हाला भेडसावणाऱ्या चिंता आणि त्यावर म्हणायचा मारुती मंत्र याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
हिंदू धर्मात प्रत्येक वार हा कोणत्यातरी देवतेला समर्पित असतो. आज मंगळवार आहे आणि आजचा दिवस मारुतीरायाला समर्पित आहे. आजच्या दिवशी कोणतंही काम रखडलेलं असेल, कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल, शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर खाली दिलेले मंत्र उच्चारण करा आणि त्याचे चमत्कारी लाभ अनुभवा.
ट्रेंडिंग न्यूज
जीवनात प्रगती हवी असल्यास म्हणा हा मंत्र
मंत्र - ओम पिंगाक्षय नमः मंत्राचा जप करा.
लाभ - दर मंगळवारी या मंत्राचा जप केल्याने तुमची व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल.
दु:ख दूर करायचं असल्यास म्हणा हा मंत्र
मंत्र- हं हनुमंते नम:
लाभ - जर तुम्हाला जीवनातील प्रत्येक दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर रुद्राक्षाच्या जपमाळाने या मंत्राचा नियमित जप करा- ॐ हं हनुमंते नम:
शत्रूवर विजय मिळवायचा असल्यास म्हणा हा मंत्र
मंत्र - ॐ पूर्वकपिमुखाय पच्चमुख हनुमते टं टं टं टं टं सकल शत्रु संहारणाय स्वाहा
लाभ - मंगळवारी हनुमानजींची विधिवत पूजा करण्यासोबत या मंत्राचा जप केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो.
इच्छापूर्ती करायची असल्यास म्हणा हा मंत्र
मंत्र - ऊं पिंगाक्षाय नमः मंत्र म्हणावा. त्यासोबत, रंजिवीन उद्दते, हारिणे वज्र देहाय चोलंग्घितमहाव्यये।
लाभ - मंगळवारी या मंत्राचा भक्तीभावाने जप केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
भीती दूर करण्याचा मंत्र
मंत्र - हं हनुमंते नमः
लाभ - जर एखाद्या व्यक्तीला जास्त भीती वाटत असेल तर प्रत्येक मंगळवारी नियमितपणे हनुमानजीच्या या मंत्राचा जप करावा. असे केल्याने तुम्हाला भीतीपासून मुक्ती मिळेल. यासोबतच जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या