When is Dhanteras & Dhantrayodashi? : यंदा १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोने, चांदी आणि भांडी खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मी, गणपती, धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. यांची पुजा केल्याे घरात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक मान्यता आहे.
पण धनत्रयोदशीची खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करू नयेत असे सांगितले जाते. त्या वस्तू कोणत्या आहेत, हे याठिकाणी जाणून घेणार आहोत.
धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त : दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस साजरी केली जाते. म्हणून धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात.
पंचांगानुसार, या वर्षी धनत्रयोदशी शुभम मुहुर्त १० नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १२:३५ वाजता सुरू होईल आणि ११ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १:६७ वाजता संपेल.
धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी शुभ मुहूर्त : धनत्रयोदशीच्या दिवशी दुपारी २:३५ वाजेपासून ते ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ६:४० पर्यंत, खरेदीसाठी हा शुभ काळ आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
पूजेची शुभ वेळ : पंचांगानुसार, धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ काळ संध्याकाळी ५:४५ पासून सुरू होईल आणि सायंकाळी ७:४२ वाजता संपेल. या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी, गणेश, कुबेर आणि धन्वंतरी देवाची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेची भांडी, सोने, चांदी, तांब्याची भांडी आणि धातूच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या वस्तू घरी आणल्याने धन-समृद्धी येते, कुटुंबातील सदस्यांना आर्थिक चणचण भासत नाही, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी काचेची भांडी खरेदी करू नयेत. काचेचा संबंध राहुशी आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी काचेचे भांडे खरेदी करू नयेत, या दिवशी काचेची भांडी खरेदी केली तर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो.
धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते.
धनत्रयोदशीच्या निमित्ताने चाकू, कात्री, सुया यांसारख्या टोकदार वस्तू खरेदी करणे टाळावे. कारण यादिवशी या वस्तू खरेदी केल्याने घरात दरिद्री येते, असे मानले जाते.
धनत्रयोदशीला तांब्या-पितळेची भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी अॅल्युमिनियम आणि स्टीलची भांडी खरेदी करू नयेत.
या शुभ मुहूर्तावर लोखंडाच्या वस्तू खरेदी करू नयेत. धनत्रयोदशीला लोखंड खरेदी केल्याने भगवान कुबेर क्रोधित होतात.
धनत्रयोदशीला खरेदी करताना कृत्रिम दागिने घेणे टाळावे. असे करणे अशुभ मानले जाते.
तसेच, जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कपड्यांची खरेदी करणार असाल तर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नका.