Ram Navami 2024: रामरक्षा स्तोत्र कधी आणि किती वेळा वाचावे? तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या...
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ram Navami 2024: रामरक्षा स्तोत्र कधी आणि किती वेळा वाचावे? तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या...

Ram Navami 2024: रामरक्षा स्तोत्र कधी आणि किती वेळा वाचावे? तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या...

Apr 16, 2024 05:25 PM IST

Ram Navami 2024 Special: असे मानले जाते की, श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने भगवान श्रीराम भक्तांचे सर्व संकट दूर करतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

रामरक्षा स्तोत्र कधी आणि किती वेळा वाचावे? तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या...
रामरक्षा स्तोत्र कधी आणि किती वेळा वाचावे? तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या...

Ram Navami 2024: बुधवारी म्हणजेच १६ एप्रिल रोजी देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी रामरक्षा पठण केलं जाणार आहे. भगवान श्रीरामाची उपासना करण्यासाठी श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे फायदेशीर आणि लाभदायक ठरते. श्री रामरक्षा स्तोत्रात भगवान श्रीरामाची स्तुती करण्यात आली आहे. असे मानले जाते की, श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने भगवान श्रीराम भक्तांचे सर्व संकट दूर करतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण असे कवच प्रदान करते, की शत्रू भक्ताला कोणत्याही प्रकारे इजा करू शकत नाही. असे मानले जाते की, या स्तोत्राचे पठण करणाऱ्यांचे श्रीराम रक्षण करतात. असे मानले जाते की, भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना रामरक्षा सांगितली. सकाळी उठल्यावर बुधकौशिक ऋषींनी ती लिहून काढली.

रामरक्षास्त्रोताचे महत्त्व :

रामरक्षास्त्रोत हे संरक्षक कवच आहे. त्याचे पठण केल्याने मनुष्य भयमुक्त होतो, असे म्हटले जाते. याचे रोज पठण केल्याने अनेक त्रास दूर होतात. दररोज रामरक्षा पठण करणाऱ्या व्यक्तींना दीर्घायुष्य, आनंद, संतती आणि विजय प्राप्त होतो, असे देखील म्हटले जाते. त्याच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीभोवती एक संरक्षक कवच तयार होते, जे प्रत्येक प्रकारच्या आपत्तीपासून त्या व्यक्तीचे रक्षण करते. असे म्हणतात की, रामरक्षा पठणाने प्रभू रामासोबतच पवनपुत्र हनुमान देखील प्रसन्न होतात. ज्या लोकांना संतती आणि धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनीही नियमितपणे याचे पठण करावे.

Mangal Dosh Upay : कुंडलीमध्ये मंगळ दोष कसा तयार होतो? मंगळ दोष कसा दूर करावा? जाणून घ्या

रामरक्षा स्त्रोत्राचे पठण करण्याचे नियम

असे मानले जाते की, जर तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी रामरक्षा स्त्रोत्राचे पठण करत असाल, तर दिवसातून ११ वेळा करा आणि ४१ दिवस नियमित पाठ करावा. या स्तोत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. पठण करताना भगवान श्रीरामाचे स्मरण करा आणि सर्व दुर्गुणांपासून दूर राहा. स्वच्छ, सात्विक रंगाचे धुतलेले कपडे घाला.

कधी वाचावी रामरक्षा?

तुम्ही दररोज, किंवा दिवसातून एकदा, सहसा सकाळी किंवा संध्याकाळी रामरक्षा वाचू शकता. एखाद्या विशेष दिवशी, सण, उपवास, रामनवमी, नवरात्री, दसरा अशा धार्मिक आणि आध्यात्मिक प्रसंगी रामरक्षा वाचणे चांगले मानले जाते.

श्री रामरक्षा स्तोत्र

।। श्रीगणेशायनमः ।।

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य। बुधकौशिकऋषिः।

श्रीसीतारामचन्द्रो देवता। अनुष्टुप् छन्दः। सीताशक्तिः।

श्रीमद्हनुमान कीलकम्। श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः।।

।। अथ ध्यानम् ।।

ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्‌मासनस्थं।

पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्॥

वामाङ्‌कारूढसीतामुखकमलमिललोचनं नीरदाभं।

नानालङ्‌कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम् ॥

।। इति ध्यानम् ।।

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्।

एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्।

जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरांतकम्।

स्वलीलया जगत् त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥३॥

शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥४॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ॥५॥

जिव्हां विद्यानिधि: पातु कण्ठं भरतवंदित:।

स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक: ॥६॥

करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित्।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ॥७॥

सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु:।

ऊरु रघूत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत् ॥८॥

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखांतक:।

पादौ बिभीषणश्रीद: पातु रामोSखिलं वपु: ॥९॥

एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठेत्।

स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥

पाताल-भूतल-व्योम-चारिणश्छद्‌मचारिण:।

न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।

नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति ॥१२॥

जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्।

य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्धय: ॥१३॥

वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत्।

अव्याहताज्ञ: सर्वत्र लभते जयमंगलम् ॥१४॥

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर:।

तथा लिखितवान् प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक: ॥१५॥

आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम्।

अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान् स न: प्रभु: ॥१६॥

तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ।

पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनांबरौ ॥१७॥

फलमूलशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ।

पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥

शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्।

रक्ष:कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥१९॥

आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङि‌गनौ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥

संनद्ध: कवची खड्‌गी चापबाणधरो युवा।

गच्छन्‌ मनोरथोSस्माकं राम: पातु सलक्ष्मण:॥२१॥

रामो दाशरथि: शूरो लक्ष्मणानुचरो बली।

काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण: कौसल्येयो रघूत्तम: ॥२२॥

वेदान्तवेद्यो यज्ञेश: पुराणपुरुषोत्तम:।

जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेयपराक्रम: ॥२३॥

अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशय: ॥२४॥

रामं दूर्वादलश्यामं पद्‌माक्षं पीतवाससम्।

स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नर: ॥२५॥

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं ।

काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्।

राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शांतमूर्तिं ।

वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥२६॥

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।

रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥२७॥

श्रीराम राम रघुनंदन राम राम।

श्रीराम राम भरताग्रज राम राम।

श्रीराम राम रणकर्कश राम राम।

श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि।

श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।

श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि।

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥

माता रामो मत्पिता रामचंद्र:।

स्वामी रामो मत्सखा रामचंद्र:।

सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं।

जाने नैव जाने न जाने ॥३०॥

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा।

पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम् ॥३१॥

लोकाभिरामं रणरङ्‌गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।

कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये ॥३२॥

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥

कूजंतं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।

आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्।

लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्।

तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥३६॥

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे।

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम:।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।

रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥३८॥

॥ इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम्॥

॥ श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु॥

Whats_app_banner