मराठी बातम्या  /  धर्म  /  Chardham Yatra Registration : चारधाम यात्रेसाठी अशी करा नाव नोंदणी, आजपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू

Chardham Yatra Registration : चारधाम यात्रेसाठी अशी करा नाव नोंदणी, आजपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 15, 2024 05:01 PM IST

Online Registration For Chardham Yatra : चार धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित झाल्यानंतर पर्यटन विभागाने नोंदणी सुरू केली आहे. यावेळी चारधाम यात्रा सुरू होण्याच्या २५ दिवस आधी यात्रेकरूंना नोंदणीची सुविधा देण्यात येत आहे. १० मेपासून चारधाम यात्रा सुरू होत आहे.

Chardham Yatra Registration : चार धाम यात्रेसाठी आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरू, चार धाम यात्रेसाठी अशी करा नोंदणी, पाहा
Chardham Yatra Registration : चार धाम यात्रेसाठी आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरू, चार धाम यात्रेसाठी अशी करा नोंदणी, पाहा (HT_PRINT)

How to Do Registration Online for Chardham Yatra : उत्तराखंडमधील चार धाम बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून (१५ एप्रिल) सुरू झाली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून यात्रेकरूंना वेबसाइट, ॲप, व्हॉट्सॲप आणि टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करता येणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेच्या कार्यालयात कॉल सेंटर सुरू झाले आहे. याद्वारे भक्तांना सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत नोंदणीशी संबंधित सर्व माहिती मिळू शकेल.

दरम्यान, १० मेपासून चारधाम यात्रा सुरू होत आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे.

चार धामचे दरवाजे उघडण्याची तारीख

केदारनाथ - १० मे 

यमुनोत्री - १० मे 

गंगोत्री - १० मे 

बद्रीनाथ - १२ मे

चार धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित झाल्यानंतर पर्यटन विभागाने नोंदणीची तयारी पूर्ण केली आहे. यावेळी चारधाम यात्रा सुरू होण्याच्या २५ दिवस आधी यात्रेकरूंना नोंदणीची सुविधा देण्यात येत आहे. जेणेकरून बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या भाविकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करता येईल आणि सहज नोंदणी करता येईल.

यावेळीही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील यात्रेकरूंना ४ माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी प्रवासी सदस्यांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि निवासस्थानाचा पत्ता यासह तपशील द्यावा लागेल.

चार धाम यात्रेसाठी अशी करा नोंदणी 

पर्यटन विभागाच्या registrationandtouristcare.uk.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करून नोंदणी करता येते. याशिवाय व्हॉट्सॲप नंबर-8394833833 वर yatra (यात्रा) लिहून मेसेज पाठवूनही नोंदणी करू शकता. 

जे पर्यटक वेबसाइटवर नोंदणी करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी पर्यटन विभागाने टोल फ्री क्रमांक – ०१३५-१३६४ वर कॉल करून नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, तुम्ही स्मार्ट फोनवर touristcarerttarakhand मोबाइल ॲपद्वारे नोंदणी करू शकता.

गेल्या वर्षी ७४ लाख भाविकाची नोंदणी 

गेल्या वर्षी चारधाम यात्रेसाठी ७४ लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली होती. यामध्ये संपूर्ण यात्रा कालावधीत ५६ लाख यात्रेकरूंनी चारधामचे दर्शन घेतले. यावेळीही भाविकांची संख्या वाढण्याची विभागाला अपेक्षा आहे.

WhatsApp channel

विभाग