मराठी बातम्या  /  religion  /  Festivals 25-29 January 2023 : हे आहेत या आठवड्यातले महत्वाचे सण उत्सव
आठवड्यातले महत्वाचे सण उत्सव
आठवड्यातले महत्वाचे सण उत्सव (हिंदुस्तान टाइम्स)

Festivals 25-29 January 2023 : हे आहेत या आठवड्यातले महत्वाचे सण उत्सव

23 January 2023, 13:48 ISTDilip Ramchandra Vaze

Important Festivals 25-29 January 2023 : जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वसंत पंचमी, शीतला षष्ठी व्रत, रथ सप्तमी आणि दुर्गाष्टमी इत्यादींचे आयोजन केले जाईल.

सध्याचा सप्ताह माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीने सुरू होत आहे. २५ जानेवारीला गणेश चतुर्थी व्रतही पाळण्यात येणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वसंत पंचमी, शीतला षष्ठी व्रत, रथ सप्तमी आणि दुर्गाष्टमी इत्यादींचे आयोजन केले जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

माघी गणेश (२५ जानेवारी २०२३)

हिंदू कॅलेंडरवर आधारित, माघ शुक्ल पक्ष चतुर्थी ही वैनायकी श्री गणेश चतुर्थी व्रत मानली जाते. गणेशजींच्या व्रतामुळे कामात सुख-समृद्धी येते आणि माघ महिन्यातील गणेश चतुर्थी व्रत हे विशेष फायदेशीर मानले जाते. संकष्टी गणेश चतुर्थी व्रत कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला आणि वैनायकी गणेश चतुर्थी व्रत शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला पाळले जाते. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सौभाग्य, बुद्धी, ज्ञान इत्यादी प्राप्त होतात.

वसंत पंचमी (२६ जानेवारी २०२३)

हिंदू पंचांग आणि पुराणांच्या आधारे माघ शुक्ल पक्ष पंचमीला सरस्वतीजी पृथ्वीवर आल्या. यासाठीच वसंत पंचमीच्या निमित्ताने प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रात सरस्वतीची पूजा केली जाते. याच दिवशी प्रयागराजमध्ये विशेष स्नानही केले जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, वसंत पंचमीच्या दिवशी ब्रह्माजींच्या कमंडलातून माता सरस्वतीचे दर्शन झाले.

रथसप्तमी (२८ जानेवारी २०२३)

माघ शु. सप्तमीला केले जाणारे हिंदूंचे एक सौर व्रत. ही सप्तमी चौदा मन्वंतरांपैकी एका मन्वंतराची प्रारंभतिथी म्हणून महत्त्वाची मानण्यात आली आहे. शिवाय, मन्वंतराच्या प्रारंभी याच तिथीला सूर्याला रथ प्राप्त झाल्यामुळे हिला रथसप्तमी म्हणतात, अशी समजूत आहे. रथ म्हणजे रथस्थ सूर्य, असा अर्थ येथे अभिप्रेत असण्याची शक्यता आहे. कारण, रथ या शब्दाचा ‘वीर’ वा ‘योद्धा’ असाही अर्थ होतो. सूर्योपासनेमध्ये रथ ह्या संज्ञेला महत्त्वाचे स्थान आहे, एवढे मात्र नक्की. रथस्थ सूर्याचे चित्र काढणे, रथाची पूजा व दान करणे इ. व्रताचरणांवरून हे स्पष्ट होते. दक्षिणायनात रथहीन झालेला सूर्य उत्तरायणात रथस्थ होतो, अशी समजूत दिसते.

दुर्गाष्टमी (२९ जानेवारी २०२३)

हिंदू धर्मात अष्टमी हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. अष्टमीला दुर्गा देवीची पूजा आणि उपवास केला जातो. प्रत्येक हिंदू महिन्यातील शुक्ल पक्षाच्या आठव्या तिथीला दुर्गाष्टमी व्रत पाळले जाते. या व्रताला दुर्गा मातेचे मासिक व्रत असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरमध्ये अष्टमी दोनदा येते, एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. शुक्ल पक्षातील अष्टमीला देवी दुर्गा उपवास करतात.

विभाग