मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Happy Republic day 2023 wishes in Marathi: भारताच्या प्रजासत्ताकाच्या एकमेकांना अशा द्या शुभेच्छा
अशा द्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
अशा द्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा (हिंदुस्तान टाइम्स)

Happy Republic day 2023 wishes in Marathi: भारताच्या प्रजासत्ताकाच्या एकमेकांना अशा द्या शुभेच्छा

25 January 2023, 13:14 ISTDilip Ramchandra Vaze

Republic Day 2023 : देश २६ जानेवारी २०२३ रोजी भारत आपला ७४वा प्रजासत्ताक दिवस साजरा करेल. कर्तव्यपथावर आपले जवान रुबाबदार चालीनं आणि शानदार संचलनानं सर्वांची मनं जिंकतील. मग अशाच वेळेस आपणही प्रजासत्ताक दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देऊया. काही खास प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा संदेश खास तुमच्यासाठी.

विविधतेत एकता असं ब्रीद मिरवणारा आपला देश. या देशाचे आपण सारे नागरिक. या देशाच्या घटनेशी वचनबद्ध असलेले आपण भारतीय. देशाचं हेच संविधान अमलात आणलं त्याचा ७४ वा महोत्सव आपण साजरा करणार आहोत. या देशाची घटना जगातली सर्वोच्च घटना मानली जाते. या देशातली लोकशाही एक मोठी लोकशाही म्हणून पाहिली जाते. २६ जानेवारी २०२३ रोजी भारत आपला ७४वा प्रजासत्ताक दिवस साजरा करेल. कर्तव्यपथावर आपले जवान रुबाबदार चालीनं आणि शानदार संचलनानं सर्वांची मनं जिंकतील. मग अशाच वेळेस आपणही प्रजासत्ताक दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देऊया. काही खास प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा संदेश खास तुमच्यासाठी.

ट्रेंडिंग न्यूज

स्वातंत्र्य आमच्या मनात

ताकत आमच्या शब्दात

शुद्धता आमच्या रक्तात

स्वाभिमान भारतीय असण्याचा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ही

आनंदाने राहण्याची एक संधी आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

 

सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।

प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

देश विविध रंगांचा

देश विविध ढगांचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा.

Happy Republic Day

 

"तनी – मनी बहरूदे नवा जोम

होऊ दे पुलकित रोम रोम

घे तिरंगा हाती

नाभी लहरु दे उंच जयघोष ,

मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

 

एक देश, एक स्वप्न

एक ओळख, आम्ही भारतीय..!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

विविधतेतील एकता या देशाची शान आहे

म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे.

विभाग