मराठी बातम्या  /  Religion  /  Guru Pradosh Vrat

Guru Pradosh Vrat : जूनच्या पहिल्याच दिवशी आलेल्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त कोणता?

गुरु प्रदोष व्रत
गुरु प्रदोष व्रत
Dilip Ramchandra Vaze • HT Marathi
Jun 01, 2023 06:07 AM IST

Importance Of Pradosh Vrat : व्रत गुरुवारी येत असल्याने याला गुरु प्रदोष व्रत असंही म्हटलं जातं. शिवशंकराची पूजा आणि कृपाप्राप्ती यासाठी हे प्रदोष व्रत केलं जातं.

प्रदोष व्रताला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा केले जाते. एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात. प्रदोष व्रतात भगवान शंकराची विधीनुसार पूजा केल्यास माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

ट्रेंडिंग न्यूज

यंदाचं प्रदोष व्रत ०१ जून २०२३ रोजी येत आहे आणि हे व्रत गुरुवारी येत असल्याने याला गुरु प्रदोष व्रत असंही म्हटलं जातं. शिवशंकराची पूजा आणि कृपाप्राप्ती यासाठी हे प्रदोष व्रत केलं जातं.

गुरु प्रदोष व्रताचे शुभ मुहूर्त कोणते आहेत हे आधी पाहूया.

गुरु प्रदोष व्रत पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?

त्रयोदशी तिथी - ०१ जून रोजी दुपारी ०१.३८ पासून सुरू होईल आणि ०२ जून रोजी रात्री १२.४७ पर्यंत चालेल. 

प्रदोष व्रत पूजा - पद्धत

सकाळी लवकर उठून आंघोळ करावी.

आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला.

घरातील मंदिरात दिवा लावावा.

भगवान भोलेनाथांचा गंगाजलाने अभिषेक करा.

भगवान भोलेनाथांना फुले अर्पण करा.

या दिवशी भोलेनाथसोबत देवी पार्वती आणि गणेशाची पूजा करावी. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते.

भगवान शंकराला नैवेद्य दाखवावा. भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे ध्यानात ठेवा.

भगवान शिवाची आराधना करा.

या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान करावे.

प्रदोष व्रताचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार आठवड्यातील सात दिवसांच्या प्रदोष व्रताचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे.

गुरु प्रदोष व्रत केल्याने इच्छित फळ मिळते.

हे व्रत पाळल्याने बालकांना फायदा होतो.

 

WhatsApp channel

विभाग