मराठी बातम्या  /  धर्म  /  Cow Urine : गोमूत्र माणसाच्या वापरासाठी सुरक्षित नाही, संशोधनातनं धक्कादायक खुलासा

Cow Urine : गोमूत्र माणसाच्या वापरासाठी सुरक्षित नाही, संशोधनातनं धक्कादायक खुलासा

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Apr 11, 2023 11:49 AM IST

Gaumutra Is Not Safe For Human : गोमूत्र घरी शिंपडल्यास घातक विषाणूंचा नाश होतो असं सांगितलं जातं. घरी एखादं मंगल कार्य असल्यासही गोमूत्र शिंपडलं जातं. सकाळी गोमूत्राचं सेवनही केलं जातं. मात्र हेच गोमूत्र मानवांसाठी अजिबात चांगलं नाही असं देशातली प्रमुख संशोधन संस्था IVRI ने स्पष्ट केलं आहे.

मानवी वापरासाठी गोमूत्र धोकादायक
मानवी वापरासाठी गोमूत्र धोकादायक (हिंदुस्तान टाइम्स)

हिंदू धर्मात गोमुत्र अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. गोमूत्र घरी शिंपडल्यास घातक विषाणूंचा नाश होतो असं सांगितलं जातं. घरी एखादं मंगल कार्य असल्यासही गोमूत्र शिंपडलं जातं. सकाळी गोमूत्राचं सेवनही केलं जातं. मात्र हेच गोमूत्र मानवांसाठी अजिबात चांगलं नाही असं देशातली प्रमुख संशोधन संस्था IVRI स्पष्ट केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बरेली स्थित आयसीएआर अर्थात इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच IVRI या देशातल्या प्रमुख प्राणी संशोधन संस्थेने या गोष्टीचा खुलासा केला आहे. या संस्थेने केलेल्या संशोधनात ताज्या गोमूत्रात धोकादायक जीवाणू असल्याचं समोर आलं आहे. संस्थेतल्या तीन पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार निरोगी गायी आणि बैलांमध्ये कमीतकमी १४ प्रकारचे हानीकारक किटाणू असतात, ज्यात Escherichia Coli असतात. यामुळे पोटाचे संसर्ग होऊ शकतात.

या संस्थेच्या संशोधनाचे निष्कर्ष रिसर्चगेट या ऑनलाइन संशोधन वेबसाइटवर प्रकाशीत केले गेले आहेत.

गायी म्हशी आणि मानवांच्या ७३ मूत्र नमुन्यांचे विष्लेषण असं दर्शवते की म्हशीच्या मूत्रातील बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गायीच्या लघवीपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे.

कोणत्याही परिस्थितीत मानवी वापरासाठी गायीच्या लघवीची शिफारस केली जाऊ शकत नाही. जून ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान केलेल्या अभ्यासातून निरोगी प्राण्याच्या लघवीच्या नमून्यांमध्ये संभाव्य रोगजनक बॅक्टेरिया आहेत.

गोमूत्र जीवाणूरोधी असल्याची सर्वसामान्य भावना आहे. या भावनेला आव्हान दिलं जाऊ शकत नाही मात्र कोणत्याही परिस्थितीत गाईचे मूत्र किंवा गोमूत्र मानवाच्या पिण्यासाठी योग्य नाही असा हा अहवाल सांगतो.

संशोधनात असंही समोर आलं आहे की, गोमूत्र कर्करोग किंवा करोनाच्या विरोधात लढण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या संशोधनाच्या अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे की, गाळलेल्या गोमूत्रात माणसाची प्रतिकारशक्ती सुधारण्याची ताकद आहे.

WhatsApp channel

विभाग