मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  WTC Final : दोन फास्ट बॉलर, दोन फलंदाज, एक स्पिनर... या ५ खेळाडूंना गुंडाळा, टेस्ट चॅम्पियनशीप जिंका

WTC Final : दोन फास्ट बॉलर, दोन फलंदाज, एक स्पिनर... या ५ खेळाडूंना गुंडाळा, टेस्ट चॅम्पियनशीप जिंका

Jun 01, 2023 09:37 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • WTC Final 2023 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून रंगणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. WTC Final जिंकून भारतीय संघ पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र, तसे पाहता इंग्लिश कंडिशन्समध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणे टीम इंडियासाठी सोपे असणार नाही.

कसोटी क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघात एकाहून एक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. या खेळाडूंकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियाला अंतिम सामना जिंकायचा असेल, तर विशेषत: या ५ खेळाडूंविरुद्ध तोडगा काढावा लागेल.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

कसोटी क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघात एकाहून एक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. या खेळाडूंकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियाला अंतिम सामना जिंकायचा असेल, तर विशेषत: या ५ खेळाडूंविरुद्ध तोडगा काढावा लागेल.(all photos- players instagram)

१) स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) : उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ भारतीय संघासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. ओव्हलच्या मैदानावर स्मिथचा रेकॉर्ड चांगला आहे. स्मिथने येथे तीन कसोटी सामन्यांमध्ये ९७.७५ च्या सरासरीने ३९१ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि एक अर्धशतक आहे. स्मिथने भारताविरुद्धच्या १८ कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत १८८७ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी ६५.०६ इतकी आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

२) उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) : सलामीवीर उस्मान ख्वाजाने यावर्षी झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत अप्रतिम फलंदाजी केली. ख्वाजाने ४ कसोटीत ४७.५७ च्या सरासरीने ३३३ धावा केल्या. त्या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. उस्मान ख्वाजाची विकेट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची असेल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

३)  मिचेल स्टार्क (Mitch Starc) : भारतीय फलंदाजांना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा तोडगा काढावा लागेल. ओव्हलच्या खेळपट्टीवर तो तुफानी गोलंदाजीने कहर करू शकतो. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आतापर्यंत भारताविरुद्ध १७ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ३८.६८ च्या सरासरीने ४४ बळी घेतले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

४) पॅट कमिन्स (Pat Cummins) : ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने आयपीएल 2023 मध्ये भाग घेतला नाही, त्यामुळे तो एकदम फ्रेश आहे. कमिन्सचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड उत्तम आहे. कमिन्सने भारताविरुद्धच्या १२ कसोटी सामन्यांमध्ये ४६ बळी घेतले आहेत. कमिन्सची खालच्या फळीतील फलंदाजीही ऑस्ट्रेलियासाठी प्रभावी ठरू शकते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

५) नॅथन लायन : ओव्हलची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी थोडीशी उपयुक्त ठरली, तर नॅथन लायन भारतासाठी अडचणीचा ठरू शकतो. उजव्या हाताचा ऑफस्पिनर लायनने भारताविरुद्धच्या २६ कसोटीत आतापर्यंत ११६ विकेट्स घेतल्या आहेत. लायनविरुद्धची छोटीशी चूकही भारतीय फलंदाजांना महागात पडू शकते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज