Pm kisan fpo scheme : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘पीएम शेतकरी एफपीओ योजना’ सुरू करण्यात आली आहे. जाणून घेऊया या योजनेविषयी
(1 / 5)
‘पीएम शेतकरी एफपीओ योजना’ च्या अंतर्गत केंद्र सरकार शेतकरी व शेती संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी १८ लाखांचे आर्थिक अनुदान उपलब्ध करते.
(2 / 5)
दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना बनवणे व त्यामध्ये सामील होणे आवश्यक आहे. या संघटनेत कमीत कमी ११ शेतकऱ्यांचा समावेश असणे आवश्यक आहे.
(3 / 5)
पीएम एफपीओ योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते.
(4 / 5)
या योजनेच्या माध्यमातून शेतकरी खते, बियाणे, केमिकल आणि कृषि यंत्र यासारखे आवश्यक कृषी साधने स्वस्त दरात खरेदी करू शकतात.
(5 / 5)
याबरोबरच शेतकरी कमी व्याज दराने बँकेतून कर्जही मिळवू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइट (enam.gov.in) वर जाऊन अर्ज करू शकतात.