१७ ऑगस्ट २०२३ रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. आज सूर्य राशीपरिवर्तन दुपारी ०१.४४ वाजता होईल. इथं आधीच बुध आणि मंगळ बसलेले आहेत त्यांच्याशी सूर्य युती करेल.
सिंह राशीत चंद्रही पाहायला मिळत आहे. चार ग्रह एकत्र आल्याने सिंह राशीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे. सिंह राशीत चतुर्ग्रही योगाचा शुभ प्रभाव कोणत्या राशींवर पडेल ते जाणून घेऊया.
मेष - चतुर्ग्रही योगाच्या शुभ प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी नेतृत्वाच्या संधी निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे, व्यवसायात योजना यशस्वी असतील, तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. व्यवसाय विस्ताराची मोठी शक्यता आहे.
कर्क - माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
तूळ - तूळ राशीच्या लोकांना चतुर्ग्रही योगातून अभूतपूर्व लाभ मिळेल. नवीन मालमत्ता खरेदी करणे खूप शुभ आणि फलदायी असेल. मुलाला करिअरमध्ये यश मिळेल. मन प्रसन्न राहील. व्यवसायात नवीन सौदे फायदेशीर ठरतील. माता लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्तीचा मार्ग खुला होईल.
मकर - १७ ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. यानं मकर राशीच्या व्यक्तींना मात्र लाभ होईल. नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींना वरीष्ठांचं मार्गदर्शन मिळेल. तुमची अपूर्ण कामं पूर्ण होण्यास मदत होईल. तुमच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ होईल. नव्या वाहनाची खरेदी करण्याचे योग आहेत. आर्थिक चणचण दूर होईल.