Maharashtra Weather Forecast : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. अनेक भागांमध्ये गेल्या २४ तासांपासून उकाडा निर्माण झाला असून लख्ख सूर्यप्रकाश पडत आहे.
(1 / 7)
Maharashtra Weather Forecast : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर नद्यांना पूर आला होता. परंतु पावसानं विश्रांती घेतली असून मुंबई आणि कोकणासह मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यांमध्ये उकाड्यात वाढ झाली आहे.(HT)
(2 / 7)
दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात विजांसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.(HT)
(3 / 7)
राज्यातील अनेक भागांमध्ये अंशतः ढगाळ हवामान असलं तरी पावसाची उघडीप कायम राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.(HT)
(4 / 7)
राज्यातील सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे.(HT)
(5 / 7)
पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तास कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी उकाडा जाणवण्याचाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.(HT)
(6 / 7)
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता पावसानं विश्रांती घेतल्यानं जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.(HT)
(7 / 7)
याशिवाय नाशिक आणि गोदावरीच्या खोऱ्यात गेल्या एका महिन्यापासून झालेल्या पावसामुळं नाशिक आणि मराठवाड्यातील धरणं भरली आहे. आता पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.(HT)