Tejashri Pradhan: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमुळे तेजश्री प्रधानला करावा लागला ट्रोलिंगचा सामना! काय होतं कारण?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tejashri Pradhan: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमुळे तेजश्री प्रधानला करावा लागला ट्रोलिंगचा सामना! काय होतं कारण?

Tejashri Pradhan: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमुळे तेजश्री प्रधानला करावा लागला ट्रोलिंगचा सामना! काय होतं कारण?

Tejashri Pradhan: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमुळे तेजश्री प्रधानला करावा लागला ट्रोलिंगचा सामना! काय होतं कारण?

Published Apr 19, 2024 04:13 PM IST
  • twitter
  • twitter
Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने खुलासा केला की, प्रेमाची गोष्ट ही मालिका स्वीकारल्यामुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता.
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या प्रचंड चर्चेत आहे. तेजश्री प्रधान ही दोन ते अडीच वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे. तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या टीव्हीवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ‘होणार सुन मी ह्या घरची’ असो किंवा ‘प्रेमाची गोष्ट’ ते अगदी ‘अग्गबाई सासुबाई’ या तेजश्री प्रधानच्या प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

तेजश्री प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करते. आपल्या आवडत्या अभिनेत्री विषयी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते देखील नेहमीच उत्सुक असतात. तिची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका काहीच दिवसांपूर्वी टीव्हीवर आली आहे. मात्र, अल्पावधीतच या मालिकेने तुफान प्रसिद्धी मिळवली. अगदी टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका टॉप ५ मालिकांमध्ये आपली जागा टिकून आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत तेजश्री प्रधान हिने खुलासा केला की, ही मालिका स्वीकारल्यामुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता. अतिशय गुणी आणि हुशार अभिनेत्री असूनही तिला ट्रोल केलं गेलं. तेजश्री प्रधानला या मालिकेतील भूमिकेमुळे ट्रोल केले गेले आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अभिनेता राज हंचनाळे तेजश्री प्रधानसोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

मात्र, ही मालिका स्वीकारल्यानंतर आणि तिचे काही एपिसोड प्रसारित झाल्यानंतर तेजश्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या मालिकेत तेजश्री प्रधान ही अभिनेता राजहंसनाळे याच्यापेक्षा वयानं फारच मोठी दिसते, असं म्हणून तिला ट्रोल केले गेले.
twitterfacebook
share
(4 / 5)

नायकापेक्षा नायिका अगदीच मोठी दिसते, असंही म्हटलं गेलं. इतकंच नाही, तर दोघांच्या उंचीवरूनही तिला अनेक गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या. मात्र, मालिका जसजशी पुढे सरकली, तसतसं हे ट्रोलिंग देखील कमी झालं. प्रेक्षकांनी या मालिकेचा स्वीकार केला आणि या मालिकेतील प्रत्येक पात्राला भरभरून प्रेम दिले. टीआरपी शर्यतीत अव्वल असणाऱ्या या मालिकेला मिळणारे प्रेम पाहून आपल्याला आनंद झाल्याचं देखील तेजश्री प्रधान म्हणते. सध्या टीआरपी शर्यतीत ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज