(1 / 6)KL Rahul- टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलकडून भारतीय चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, राहुल आतापर्यंत काहीच करु शकला नाही. ३ सामन्यांत त्याच्या नावावर फक्त ४, ९, ९ अशा धावा आहेत. अशा स्थितीत त्याच्या प्लेइंग-११ मध्ये खेळण्यावर चाहते प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. पण प्रशिक्षक राहुल द्रविडने स्पष्ट केले आहे की केएल राहुल प्लेइंग-११ चा भाग राहणार आहे.