मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shani Sade Sati: शनीचा प्रकोप होणार! ‘या’ राशींना सुरू होणार शनीची साडेसाती; पाहा कोणत्या आहेत या राशी...

Shani Sade Sati: शनीचा प्रकोप होणार! ‘या’ राशींना सुरू होणार शनीची साडेसाती; पाहा कोणत्या आहेत या राशी...

Apr 18, 2024 06:48 PM IST Harshada Bhirvandekar

Shani Sade Sati: शनी दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो, त्यामुळे शनीचे शुभ-अशुभ प्रभाव आयुष्यावर दीर्घकाळ राहतात.

ज्योतिष शास्त्रात शनीला न्याय देवता म्हटले गेले आहे. कारण, शनी व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारावर फळ देतो. शनीदेवाची शिक्षा एखाद्या राजाला भिकारीही बनवू शकते. त्यामुळे शनीदेवाबद्दल लोकांच्या मनात भीती असते. तसेच, शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे. शनी दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो, त्यामुळे शनीचे शुभ-अशुभ प्रभाव आयुष्यावर दीर्घकाळ राहतात. २०२३मध्ये शनीचे संक्रमण होऊन त्याचा कुंभ राशीत प्रवेश झाला होता. २०२४मध्ये शनी त्याची मूळ रास कुंभमध्ये राहील आणि २९ मार्च २०२५ रोजी शनी मीन राशीत प्रवेश करेल.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीत शनीची साडेसाती चालू आहे. २०२५मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीला शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. त्याच वेळी, २०२५पासून कुंभ आणि मीन राशीसह मेष राशीवर साडेसाती सुरू होणार आहे. २०२५पासून मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीची पहिली अवस्था सुरू होईल. या साडेसातीचा तिसरा चरण कुंभ राशीवर असेल आणि दुसरा चरण मीन राशीवर असेल. शनीची साडेसाती आर्थिक, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक तसेच करिअरच्या बाबतीत त्रास देणारी ठरेल. साडेसातीच्या काळात व्यक्तीला नुकसान, त्रास, प्रगतीतील अडथळे, रोग, अपघात इत्यादींना सामोरे जावे लागू शकते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मेष: मार्च २०२५पासून मेष राशीवर शनीची साडेसाती सुरू होताच अडचणी वाढतील. मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू लागेल. काही मोठे नुकसान होऊ शकते. तसेच उत्पन्न कमी होऊन खर्च वाढेल. याशिवाय शारीरिक समस्याही निर्माण होतील. हाडांशी संबंधित आजार होऊ शकतात. अपघातात गंभीर दुखापत होऊ शकते. जोडीदाराची साथ मिळणार नाही.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

कुंभ: शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा कुंभ राशीच्या लोकांना खूप त्रास देऊ शकतो. आर्थिक समस्या निर्माण होतील. नोकरीत पुन्हा-पुन्हा समस्या निर्माण होतील. बदली होईल. सहकाऱ्यांसोबत समस्या निर्माण होतील, ज्यामुळे तुमचे मोठे नुकसान होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार नाही. व्यवसाय करणाऱ्यांनाही अडचणी येऊ शकतात. खर्च वाढतील. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मीन: शनीच्या साडेसातीची दुसरी अवस्था अत्यंत क्लेशदायक मानली जात आहे. मीन राशीवर शनीच्या साडेसातीचे दुसरे चरण असणार असून, यामुळे संपत्ती आणि करिअरशी संबंधित अनेक समस्या निर्माण होणार आहेत. तब्येत बिघडू शकते. आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. व्यवसायात नुकसान होऊ शकते. नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत राहाल. दुखापत होऊ शकते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

मीन: शनीच्या साडेसातीची दुसरी अवस्था अत्यंत क्लेशदायक मानली जात आहे. मीन राशीवर शनीच्या साडेसातीचे दुसरे चरण असणार असून, यामुळे संपत्ती आणि करिअरशी संबंधित अनेक समस्या निर्माण होणार आहेत. तब्येत बिघडू शकते. आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. व्यवसायात नुकसान होऊ शकते. नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत राहाल. दुखापत होऊ शकते.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज