महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या या पावनभूमीत अनेक संत महात्म्य होऊन गेले. संतांच्याच वाणीवर आज मनुष्य आपलं आयुष्य जगताना दिसत आहेत. अशाच काही पूज्य संतांपैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज. सावळ्या विठ्ठलाचे परमभक्त झालेले तुकोबाराय फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठी निघून केले.
(All Photos: Twitter)संत तुकोबारायांच्या वैकुंठागमनाच्या दिवसाला ‘तुकाराम बीज’ म्हटले जाते. आजच्याच दिवशी संत तुकोबाराय सदेह वैकुंठागमनाला गेले. तुकोबारायांच्या अभंगांनी आजही प्रत्येक पिढी भारावून जाते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून प्रत्येकालाच प्रेरणा मिळते.
काळाच्या पुढचा विचार करणारे सत्यशोधक संत, अशी तुकोबारायांची ओळख होती. त्यांच्या अभंगांना व्यवहारिक ज्ञानाची जोड होती. तुकोबारायांनी सामान्य माणसाच्या जगण्यातील अनेक विचार साहित्यातून मांडले. वारकरी, संत संप्रदायातील संत तुकाराम महाराज हे विठोबाचे परमभक्त होते.
संत तुकोबारायांचा जन्म देहू या गावात झाला होता. संत तुकोबांची विठोबावर इतकी भक्ती होती की, स्वतः विठुरायाला तुकोबारायांची भेट भूतलावर यावं लागलं, असं म्हणतात. विठ्ठल स्वतः तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठी घेऊन गेल्याचे म्हटले जाते. म्हणूनच या दिवसाला ‘तुकाराम बीज’ म्हणूनही ओळखले जाते.
संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम केले. ‘संत तुकाराम बीज’ या दिवशी सगळे भाविक संत तुकाराम महाराजांच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करतात. यावर्षी २७ मार्च म्हणजेच आज ‘तुकाराम बीज’ आहे. ‘तुकाराम बीज’च्या निमित्ताने असंख्य भाविक खास देहू गावात तुकोबारायांचा दर्शन घेण्यासाठी जमतात.