Prajakta Mali: प्राजक्ता माळीने तिचा ‘प्राजक्तराज’ नावाचा पारंपारिक दागिन्यांचा ब्रँड सुरू केला आहे. या ब्रँडचं प्रमोशन प्राजक्ता माळी स्वतःच करत आहे.
(1 / 5)
टीव्ही, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर आता प्राजक्ता माळी व्यवसाय क्षेत्रात सक्रिय झाली आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(2 / 5)
प्राजक्ता माळीने तिचा ‘प्राजक्तराज’ नावाचा पारंपारिक दागिन्यांचा ब्रँड सुरू केला आहे. स्वतःच्या या ब्रँडचं प्रमोशन प्राजक्ता माळी स्वतःच करत आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(3 / 5)
नुकतेच तिने पारंपारिक नऊवारी साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे. यात फोटोशूटमध्ये प्राजक्ताने ‘पुतळीहार’ घातला आहे. हा हार तिच्या गळ्यात अगदी शोभून दिसत आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(4 / 5)
या पारंपारिक अवतारात अभिनेत्री प्राजक्ता माळी खूप सुंदर दिसत आहे. तिच्या या रूपावर चाहते देखील भाळले आहेत. चाहते देखील तिच्या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत आहेत. (Photo: @prajakta_official/IG)
(5 / 5)
‘जो आपल्याला कोल्हापूरच्या “महालक्ष्मी”च्या गळ्यात पहायला मिळतो. ज्यात पुतळ्यांवर लक्ष्मी असते. अतिशय जुना, हलका आणि adjustable असल्याने माझा विशेष प्रिय अलंकार’ असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. (Photo: @prajakta_official/IG)