(5 / 13)सिंह: आजचं आर्थिक बाबतीत चांगले संकेत मिळतील. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले, तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. संततीची प्रगती पाहून मन समाधानी राहील. परदेशभ्रमण घडेल. कामासाठी दूरचे प्रवास घडतील. कोणतेही काम जबाबदारीने करावे. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. दिनमान उत्तम राहील.