Mumbai Rape News: मुंबईच्या विक्रोळी परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली. भाचीवर बलात्कार केल्याप्रकरणी तिच्या मामाला अटक करण्यात आली. गेल्या सात वर्षांपासून आरोपी पीडितावर अत्याचार करत होता. परंतु, शनिवारी पीडिताच्या पालकांना तिच्यामधील शारीरिक बदल जाणवला. यानंतर त्यांनी पीडिताची वैद्यकीय तपासणी केली असता ती चार महिन्याची गरोदर असल्याचे उघड झाले. याप्रकरणी पीडितेची विचारपूस केली असता तिने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर तासाभरातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता सध्या २४ वर्षांची असून ती १७ वर्षाची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू होते. पीडिता आरोपीच्या घरी ये- जा करत करायची. मात्र, पीडिताने कधीच तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत खुलासा केला नाही.कारण, याबाबत कुठेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी आरोपीने पीडिताला दिली होती. परंतु, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला पीडिताच्या पालकांना तिचे पोट पाहिले, जे गर्भवती महिलांसारखे दिसत होते. यानंतर पालकांनी वैद्यकीय तापसणी करण्यासाठी तिला जवळच्या रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी पीडिता चार महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले.
याप्रकरणी पीडिताकडे विचारपूस केली असता तिने हा सगळा प्रकार तिच्या आजीला सांगितला. याप्रकरणी पीडिताच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. यानंतर अवघ्या तासाभरात पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
Mumbai Rape News: मुंबईच्या विक्रोळी परिसरात अत्यंत धक्कादायक घटना घडली. भाचीवर बलात्कार केल्याप्रकरणी तिच्या मामाला अटक करण्यात आली. गेल्या सात वर्षांपासून आरोपी पीडितावर अत्याचार करत होता. परंतु, शनिवारी पीडिताच्या पालकांना तिच्यामधील शारीरिक बदल जाणवला. यानंतर त्यांनी पीडिताची वैद्यकीय तपासणी केली असता ती चार महिन्याची गरोदर असल्याचे उघड झाले. याप्रकरणी पीडितेची विचारपूस केली असता तिने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर तासाभरातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता सध्या २४ वर्षांची असून ती १७ वर्षाची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू होते. पीडिता आरोपीच्या घरी ये- जा करत करायची. मात्र, पीडिताने कधीच तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत खुलासा केला नाही.कारण, याबाबत कुठेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी आरोपीने पीडिताला दिली होती. परंतु, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला पीडिताच्या पालकांना तिचे पोट पाहिले, जे गर्भवती महिलांसारखे दिसत होते. यानंतर पालकांनी वैद्यकीय तापसणी करण्यासाठी तिला जवळच्या रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी पीडिता चार महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले.
याप्रकरणी पीडिताकडे विचारपूस केली असता तिने हा सगळा प्रकार तिच्या आजीला सांगितला. याप्रकरणी पीडिताच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. यानंतर अवघ्या तासाभरात पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
गाझियाबादमधील मोदीनगरच्या कॉलनीत पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. आरोपीच्या पत्नीचा मृत्यू झाला असून तो गेल्या वर्षांपासून पीडितावर लैंगिक अत्याचार करीत होता. याबाबत पीडिताच्या भावाला आणि काकाला माहिती असूनही त्यांनी आरोपीला विरोध केला नाही. परंतु, पीडिताला त्रास सहन न झाल्याने तिने थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिच्यासोबत घडलेल्या संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. २०१८ मध्ये मुलीच्या आईचा मृत्यू झाला होता. आईच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली, असे पीडिताने आपल्या तक्रारीत नमूद केले.