मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photo गुवाहाटीत बंडखोर आमदारांसाठी ७० खोल्या बूक, जाणून घ्या एक दिवसाचा खर्च

Photo गुवाहाटीत बंडखोर आमदारांसाठी ७० खोल्या बूक, जाणून घ्या एक दिवसाचा खर्च

Jun 24, 2022 12:21 PM IST Suraj Sadashiv Yadav
  • twitter
  • twitter

  • गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय भूकंप आला असून याचा केंद्रबिंदू असलेले एकनाथ शिंदे हे आसाममधील गुवाहाटीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार गुवाहाटीतील हॉटेलमध्ये थांबले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय भूकंप आला असून याचा केंद्रबिंदू असलेले एकनाथ शिंदे हे आसाममधील गुवाहाटीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार गुवाहाटीतील हॉटेलमध्ये थांबले आहेत.(फोटो - एएनआय)

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० पेक्षा अधिक आमदारांचे वास्तव्य गेल्या दोन दिवसांपासून गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहे. सोशल मीडियावर या हॉटेलमधील आमदारांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० पेक्षा अधिक आमदारांचे वास्तव्य गेल्या दोन दिवसांपासून गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहे. सोशल मीडियावर या हॉटेलमधील आमदारांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.(फोटो - एएनआय)

एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार ज्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत तिथे पोलिसांची मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. इतर कोणालाही हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात नाहीय.
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार ज्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत तिथे पोलिसांची मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. इतर कोणालाही हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात नाहीय.

एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आमदार आधी गुजरातला गेले. तिथून ते आसामच्या गुवाहाटीत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे गुजरात आणि आसाम ही दोन्ही राज्ये भाजपशासित आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आमदार आधी गुजरातला गेले. तिथून ते आसामच्या गुवाहाटीत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे गुजरात आणि आसाम ही दोन्ही राज्ये भाजपशासित आहेत.(फोटो - एएनआय)

बंडखोर आमदारांनी ७ दिवसांसाठी ७० खोल्या बूक केल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. एक दिवसाचा यासाठीचा खर्च जवळपास ८ लाख रुपयांपर्यंत आहे अशी माहिती समजते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

बंडखोर आमदारांनी ७ दिवसांसाठी ७० खोल्या बूक केल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. एक दिवसाचा यासाठीचा खर्च जवळपास ८ लाख रुपयांपर्यंत आहे अशी माहिती समजते.(फोटो - रॅडिसन ब्लू हॉटेल)

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या या बंडखोरीनंतर आमदारांच्या राहण्याचा सोडून प्रवासाचा, चार्टर्ड फ्लाइटचा खर्च वेगळाच आहे. एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह हॉटेलमध्ये राहिले आहेत. तसंच शिवेसनेच्या आमदारांसह अपक्ष आमदारही त्यांच्यासोबत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

हॉटेलमधील ७० खोल्या बंडखोर आमदार आणि त्यांच्यासोबत असलेल्यांसाठी बूक करण्यात आल्या आहेत. आता हॉटेल मॅनेजमेंटकडून नवीन बूकिंग घेतलं जात नाहीय. ज्यांनी आधी बूकिंग केलं होतं त्यांनाही थांबवण्यात येत आहे. आधीपासून तिथे असलेल्यांसाठीच आता प्रवेश दिला जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये ७ दिवसांसाठी ७० खोल्यांच्या भाड्याचा एकूण खर्च जवळपास ५६ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय दररोजचं खाण्यासाठी आणि इतर सेवांचा खर्च ८ लाख रुपयांपर्यंत आहे. रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकूण १९६ खोल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

शिवसेनेचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. भाजपसोबत मिळून सरकार स्थापन करायला हवे अशी मागणी करण्यात येत आहे.
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

शिवसेनेचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. भाजपसोबत मिळून सरकार स्थापन करायला हवे अशी मागणी करण्यात येत आहे.(ANI/pic service)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज