मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला होता. मात्र, पंजाबला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १९२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबला १९.१ षटकात १८३ धावाच करता आल्या.
(PTI)पंजाबविरुद्धच्या या विजयानंतर मुंबईचे ६ गुण झाले आहेत. दुसरीकडे पंजाबचे केवळ ४ गुण आहेत. चला तर मग जाणून घेऊया मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यानंतर गुणतालिकेत किती बदल झाला आहे.
(AFP)पंजाबविरुद्धच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स संघ ६ गुणांसह ७व्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रनेरट -०.१३३ इतका आहे. सामना गमावलेला पंजाब किंग्स ४ गुण आणि -०.२५१ च्या नेट रनरेटसह ९व्या स्थानावर आहे.
(AFP)राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. संजू अँड कंपनी ७ सामन्यांतून १२ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.
(ANI )कोलकाता नाईट रायडर्स सलग दोन सामने गमावल्यानंतर ८ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेट रन रेटच्या बाबतीत श्रेयस अय्यरचा संघ चेन्नई सुपर किंग्जपेक्षा पुढे आहे.
(AFP)चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ६ सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात ८ गुण जमा झाले आहेत. चेन्नईचा सामना शुक्रवारी लखनौशी होणार आहे. हा सामना जिंकल्यास चेन्नई सुपर किंग्ज कोलकाता नाईट रायडर्सला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर पोहोचेल.
(PTI)