दीपिका घोष- आयपीएल २०१९ मध्ये आरसीबीची महिला फॅन व्हायरल झाली. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीला सपोर्ट करताना ती कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्यानंतर ती व्हायरल झाली. या मिस्ट्री गर्लचे नाव दीपिका घोष आहे.
रियाना लालवानी- आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुपर ओव्हरचा सामना झाला होता. या सामन्यातील सुपर ओव्हरचा थरार पाहून प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. अशा परिस्थितीत अचानक एक मिस्ट्री गर्ल कॅमेऱ्यात कैद झाली, तिचे नाव आहे रियाना लालवानी. त्या सामन्यादरम्यान रियानाने खूपच चर्चा मिळवली होती. त्यानंतर ती प्रसिद्ध झाली.
अदिती हुंडिया - IPL २०१९ दरम्यान अदिती हुंडिया मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पाहण्यासाठी आली होती. या सामन्यादरम्यान ती प्रसिद्धीच्या झोतात आली. अदिती एक मॉडेल आहे.
मालती चहर - २०१८ च्या आयपीएलमध्ये एका मिस्ट्री गर्लने बरीच चर्चा मिळवली होती. विशेष म्हणजे ही मिस्ट्री गर्ल दुसरी कोणी नसून चहर बंधूंची बहीण मालती चहर होती. चेन्नई-मुंबईचा सामना पाहण्यासाठी ती आली होती आणि कॅमेऱ्यात कैद झाल्याने ती रातोरात प्रसिद्ध झाली.