GT vs CSK : सीएसके १०व्यांदा आयपीएल फायनलमध्ये, क्वालिफायर 1 मध्ये गुजरातला पराभवाचा धक्का
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  GT vs CSK : सीएसके १०व्यांदा आयपीएल फायनलमध्ये, क्वालिफायर 1 मध्ये गुजरातला पराभवाचा धक्का

GT vs CSK : सीएसके १०व्यांदा आयपीएल फायनलमध्ये, क्वालिफायर 1 मध्ये गुजरातला पराभवाचा धक्का

GT vs CSK : सीएसके १०व्यांदा आयपीएल फायनलमध्ये, क्वालिफायर 1 मध्ये गुजरातला पराभवाचा धक्का

May 24, 2023 12:03 AM IST
  • twitter
  • twitter
  • GT vs CSK Qualifier 1 highlights : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. CSK ने चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या क्वालिफायर-1 मध्ये गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २८ मे रोजी अंतिम सामना होणार आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २३ मे (मंगळवार) रोजी झालेल्या क्वालिफायर-1 सामन्यात CSK ने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. 
twitterfacebook
share
(1 / 5)
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २३ मे (मंगळवार) रोजी झालेल्या क्वालिफायर-1 सामन्यात CSK ने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. (AP)
१७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संघ २० षटकांत १५७ धावांत आटोपला. या पराभवानंतर गुजरात टायटन्सला फायनल गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. गुजरात टायटन्स आता २६ मे रोजी दुसऱ्या क्वालिफायर सामना खेळेल. 
twitterfacebook
share
(2 / 5)
१७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संघ २० षटकांत १५७ धावांत आटोपला. या पराभवानंतर गुजरात टायटन्सला फायनल गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. गुजरात टायटन्स आता २६ मे रोजी दुसऱ्या क्वालिफायर सामना खेळेल. (IPL Twitter)
१७३ धावांचा पाठलाग करताना १४व्या षटकात दीपक चहरने स्लो कटरमध्ये शुभमन गिलची शिकार केली, हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. तोपर्यंत सामना गुजरातच्या बाजूने होता. त्यावेळी गुजरात टायटन्सने १३ षटकात ८८ धावा केल्या होत्या. त्यांना ४२ चेंडूत ८५ धावा हव्या होत्या. 
twitterfacebook
share
(3 / 5)
१७३ धावांचा पाठलाग करताना १४व्या षटकात दीपक चहरने स्लो कटरमध्ये शुभमन गिलची शिकार केली, हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. तोपर्यंत सामना गुजरातच्या बाजूने होता. त्यावेळी गुजरात टायटन्सने १३ षटकात ८८ धावा केल्या होत्या. त्यांना ४२ चेंडूत ८५ धावा हव्या होत्या. (ANI)
गुजरातकडून शुभमन गिलने ३८ चेंडूत सर्वाधिक ४२ धावा केल्या. तर चेन्नईकडून दीपक चहर, महिष थीक्षाना आणि रवींद्र जडेजाने २-२ बळी घेतले.  
twitterfacebook
share
(4 / 5)
गुजरातकडून शुभमन गिलने ३८ चेंडूत सर्वाधिक ४२ धावा केल्या. तर चेन्नईकडून दीपक चहर, महिष थीक्षाना आणि रवींद्र जडेजाने २-२ बळी घेतले.  (IPL Twitter)
सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने ४४ चेंडूत सर्वाधिक ६० धावांची खेळी केली, ज्यात सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर रविंद्र जडेजाने २२ तर अजिंक्य रहाणेने १७ धावांचे योगदान दिले.
twitterfacebook
share
(5 / 5)
सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने ४४ चेंडूत सर्वाधिक ६० धावांची खेळी केली, ज्यात सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर रविंद्र जडेजाने २२ तर अजिंक्य रहाणेने १७ धावांचे योगदान दिले.(ANI)
इतर गॅलरीज