सूर्यग्रहण पाहतांना सुरक्षेला प्राधान्य द्या: सूर्यग्रहण पाहताना डोळ्याची काळजी घेणे गरजेचे असते. तुमचे डोळे आणि कॅमेरा किंवा टेलिस्कोप दोन्ही योग्य सोलर फिल्टरने संरक्षित केली असल्याची खात्री करा. डोळ्यांनायोग्य संरक्षण असल्याशिवाय संपूर्ण सूर्यग्रहण कधीही थेट उघड्या डोळ्याने पाहू नका. डोळ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तुमच्या कॅमेरा लेन्ससाठी सोलर फिल्टर वापरा. सूर्यकडा सुरक्षितपणे कॅप्चर करण्यासाठी सूर्यग्रहणा दरम्यान, दरम्यान फिल्टर काढण्याचे लक्षात ठेवा.
(NASA)उपलब्ध उपकरणे वापरा: तुमचा कॅमेरा कुठलाही असो, DSLR असो वा स्मार्टफोन, तुम्ही कोणत्याही उपकरणाने चंगल्या प्रकारे सूर्यग्रहण पाहू शकता. छोटी उपकरणे देखील तुम्हाला चांगले परिमाण देऊ शकतात. टेलिफोटो लेन्ससारखे विशेष उपकरण नसल्यास, सूर्यग्रहण पाहण्यासाठी किवा कॅप्चर करण्यासाठी लँडस्केप शॉट्सची निवड करा.
(NASA)ट्रायपॉड आणि विलंबित शटर रिलीझ टायमर यांसारख्या अतिरिक्त उपकरणे वापरा. विशेषत: कमी-प्रकाशाच्या परिस्थितीत, तुम्ही घेत असलेल्या सूर्याच्या प्रतिमा स्थिरता लक्षणीयरीत्या सुधारू शकतात. ट्रायपॉड स्थिर छायाचित्रणांची खात्री देते. तर टाइमरद्वारे कॅमेरा स्थिर ठेवता येऊ शकतो
(NASA)ग्राहणाची छायाचित्रे अथवा व्हिडिओ टिपण्यासोबतच आजूबाजूच्या वातावरणाचा देखील आनंद अनुभवा. सूर्यग्रहण लागतांना सूर्याच्या आजूबाजूचा प्रकाश, ऊन सवलीचा सावलीचा खेळ आणि तुमच्या आजूबाजू असलेले नागरिक कशा पद्धतीने ग्रहण पाहत आहेत, याचे निरक्षण करत तुमच्या छायाचित्रे कशी चांगली येतील यासाठी प्रयत्न करा.
(NASA)