(3 / 13)वृषभ: आज कलाक्षेत्रातील व्यक्तींची मान प्रतिष्ठा प्रतिभा वाढीस लागेल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढती व वेतनवाढीचा योग आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. नवीन समूहाशी जोडले जाण्याची शक्यता आहे. राजकीय,सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. राजाश्रय मिळेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. आरोग्य उत्तम राहील.