(2 / 13)मेषः आज आपणास रोजगारात यश मिळाल्याने उत्साह वाढेल. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. मानसन्मान वाढीस लागेल. घर वाहन खरेदीचा योग आहे. प्रवास लाभदायक होतील.शुभरंगः केसरी शुभदिशाः नैऋत्य.