आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबादसमोर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे आव्हान असेल. यंदाच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. तर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यामुळे दोन्ही संघ मोसमातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत.
(PTI)मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासोबत इशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला येऊ शकतो. यानंतर मधल्या फळीत तिलक वर्मा, नमन धीर आणि हार्दिक पांड्यासारखे फलंदाज असतील. यानंतर फिनीशरची जबाबदारी टीम डेव्हिडवर असेल. तसेच, गोलंदाज म्हणून शम्स मुलानी, पियुष चावला, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड हे प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात.
(PTI)मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेवन- रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.
(PTI)सनरायझर्स हैदराबादसाठी मयंक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठी सलामीवीराची भूमिका बजावू शकतात. यानंतर एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद आणि शाहबाज अहमदसारखे फलंदाज असतील.
हेन्रिक क्लासेनवर असतील सर्वांच्या नजरा- विशेषत: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चमकदार खेळ करणाऱ्या हेनरिक क्लासेनवर सर्वांच्या नजरा असतील. त्याचबरोबर मार्को यान्सेन, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन ही गोलंदाजांची फौज सनरायझर्स हैदराबादकडे आहे.