loksabha election : देवदर्शन, रोड शो आणि सभा घेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  loksabha election : देवदर्शन, रोड शो आणि सभा घेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

loksabha election : देवदर्शन, रोड शो आणि सभा घेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

loksabha election : देवदर्शन, रोड शो आणि सभा घेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

Apr 18, 2024 03:59 PM IST
  • twitter
  • twitter
loksabha election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे शहर, सातारा, रायगड येथील लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ति प्रदर्शन महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी केले.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे शहर येथील लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज लोकसभा निवणुकीसाठी अर्ज भरले. बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार पक्षातर्फे ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ति प्रदर्शन केले.  सुप्रिया सुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार अमोल कोल्हे, आमदार रविद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात उपस्थित होते.  
twitterfacebook
share
(1 / 8)

तर शिरूर लोकसभा मतदार संघातून अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. कोल्हे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. 
twitterfacebook
share
(2 / 8)

पुणे लोकसभा मतरदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील जोरदार शक्ति प्रदर्शन केले. आमदार बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 
twitterfacebook
share
(3 / 8)

महाविकास आघाडीचेचे उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर यांनी अर्ज भरल्यावर जोरदार शक्ति प्रदर्शन केले. यावेळी झालेल्या सभेत मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.  
twitterfacebook
share
(4 / 8)

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी देखील बारामती लोकसभा मतदार संघासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. या पूर्वी सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत आरती केली. यानंतर महायुतीची सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार रामदास आठवले, चंद्रकांत पाटील आदि उपस्थित होते. 
twitterfacebook
share
(5 / 8)

सुनेत्रा पवार यांच्या सोबत अर्ज भरतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल पटेल, रामदास आठवले, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, निलम गोरे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. 
twitterfacebook
share
(6 / 8)

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  आपला अर्ज दाखल करण्याआधी उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात शक्तीप्रदर्शन केले.  यावेळी महायुतीतील नेतेही त्यांच्यासोबत होते.  उदयनराजे भोसले यांच्या सोबत शिवेंद्रराजे भोसले हे देखील होते.  शिवेंद्रराजे हे उदयनराजे यांच्या रॅलीत  सहभागी झाले होते. खासदार उदयनराजे भोसले हे जलमंदिर निवासस्थानातून बैलगाडीमध्ये उभं राहून गांधी मैदानाच्या दिशेने झाले. खासदार उदयनराजे भोसले यांचा महायुतीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधी मैदानातून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली. उदयनराजे भोसले यांच्यासोबत शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अतुल भोसले उपस्थित आहेत.
twitterfacebook
share
(7 / 8)

तर रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, रिपाई, रासप, मनसे महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मा.ना. रविंद्रजी चव्हाण , शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, आ. महेंद्र दळवी, धैर्यशील पाटील, तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज