Budh Gochar 2024 : १९ एप्रिल रोजी मीन राशीत बुधाचा उदय होणार आहे. काही राशींसाठी बुध भ्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे…
(1 / 5)
नऊ ग्रहांपैकी बुध हा बुद्धिमत्ता आणि वक्तृत्वाचा दाता आहे. १९ एप्रिल रोजी सकाळी १०.२३ वाजता बुध मीन राशीत उदयाला आला आहे. बुधाच्या उदयामुळे काही राशींना मोठा दिलासा मिळणार आहे. कोणत्या आहेत ‘या’ राशी, जाणून घेऊया…
(2 / 5)
कर्क : बुधाचा उदय कर्क राशीच्या लोकांचे भाग्य उजळवणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या परिश्रमाचे आणि कष्टाचे योग्य फळ मिळणार आहे. तुम्ही तुमच्या इच्छित ठिकाणी नोकरीची बदली मिळवू शकता. काही लोकांना चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात फायदा होईल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील.
(3 / 5)
कन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी मीन राशीत बुधाचा उदय करिअरमध्ये चांगला परिणामकारक ठरेल. नोकरीत तुम्हाला अधिक लाभ मिळू शकतो. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. काही लोक आर्थिक संकटात सापडू शकतात.
(4 / 5)
मकर : बुधाचा उदय मकर राशीसाठी शुभ ठरणार आहे. लांबचे प्रवास फलदायी होईल. प्रत्येक पावलावर शुभेच्छा तुमच्या सोबत असतील. नोकरीत प्रगती होईल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. काहींना परदेशात जाण्याची संधी मिळेल. व्यवसायात फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
(5 / 5)
मीन : मीन राशीत बुधाचा उदय होणार आहे. यामुळे प्रेम जीवनासाठी अनुकूल वेळ असेल. जोडीदारा सोबतच्या संबंधांमध्ये चांगला ताळमेळ राहील. मीन राशीमध्ये बुधाचा उदय तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे. काही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही खूप बचत करू शकाल. करिअरमध्ये यश मिळेल.