(5 / 4)तिकडे मी आता मेकअपशिवाय बिनधास्त फिरते. मी लावलेल्या झाडांची काळजी घेते. मला पेंटिंगची खूप आवड आहे, तिथे गेल्यापासून मी ही आवड देखील जोपासली आहे. प्रवासाच्या दृष्टीने थोडा त्रास झाला, पण आता त्याची सवय झाली आहे. आता आम्हाला तिथे जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. मूल जन्माला घालण्याविषयी बोलताना प्रार्थना म्हणाली की, मला कधीच मूल नको होतं. त्याऐवजी मला भरपूर प्राणी पाळायचे होते. माझं जेव्हा अभिषेक लग्न ठरलं, तेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याची देखील हीच इच्छा होती, हे आम्हाला कळलं. आम्हाला दोघांनाही प्राण्यांची प्रचंड आवड होती. त्यामुळे आम्ही मूल न होऊ देता, प्राण्यांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या या निर्णयाला आमच्या कुटुंबाचा देखील पाठिंबा आहे.