(5 / 7)विंडो एसी किंवा स्प्लिट एसी : विंडो एसीच्या तुलनेत स्प्लिट एसीमध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. मात्र, स्प्लिट एसीची किंमतही जास्त आहे. स्प्लिट एसी कोणत्याही खोलीत सहज बसवता येतो. दुसरीकडे घरात विंडो एसी बसवण्यासाठी खिडक्या असायला हव्यात. स्प्लिट एसीमध्ये तुम्हाला ऑनबोर्ड स्लीपिंग, टर्बो कूलिंग सह अनेक उत्तम फीचर्स मिळतात. आपल्याला यापैकी कोणत्या गोष्टीची अधिक आवश्यकता आहे याचा आधी विचार करा.