बायकोच्या अफेअरचं कळल्यावर डोकंच फिरलं; त्यानं कुटुंबासह गाडी नदीत घातली; चौघांचा मृत्यू
पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून कुटुंबाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमध्ये घडला आहे. आत्महत्या करण्याआधी त्यांनी व्हिडीओसुद्धा केला होता.
पत्नीचे फायनान्सरसोबत असलेल्या संबंधांना कंटाळून पतीने कुटुंबासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक असा प्रकार पंजाबमध्ये घडला आहे. फिरोजपूर जिल्ह्यात एका व्यक्तीने मुलगी, पुतण्या, भावासह कारचा नदीत अपघात घडवला. या अपघातात चौघांचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कार आणि मृतदेह बाहेर काढले आहेत. दरम्यान, आत्महत्या करण्याआधी त्यांनी व्हिडीओसुद्धा केला होता.
ट्रेंडिंग न्यूज
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जसविंदर सिंह यांनी त्यांच्या पत्नीवर अनैतिक संबंधांचे आरोप केले. तसंच कार चालवत त्यांनी व्हिडीओसुद्धा शूट केला असून ते रडताना दिसतात. गाडीत असलेल्या चौघांनाही आपण आत्महत्या करायला निघालो आहोत याची माहिती होती. आपल्या पत्नीचे एका फायनान्सरसोबत अनैतिक संबंध आहेत असे आरोप पती जसविंदर सिंह यांनी केले. तसंच सासू आणि मेहुणी संसार नीट होऊ देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
कारमध्ये जसविंदर सिंह यांचे मोठे बंधू हरप्रित सिंह, मुलगी गुरलीन आणि पुतण्या अगम होते. नदीच्या पुलावर आल्यानतंर जसविंदरने गाडी नदीच्या पाण्यात घातली. स्थानिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी कार बाहेर काढली मात्र कारमधील सर्वांचा मृत्यू झाला होता.
व्हिडीओत कारमधील लहान मुलांनीही आपल्याला जगायचं नसल्याचं म्हटलं आहे. तसंच जसविंदर सिंह यांच्या भावानेसुद्धा त्यांच्या व्हिडीओत वहिनीबद्दल सांगितलं आहे. त्याची वहिनी काला संधू नावाच्या फायनान्सरसोबत राहत असून तिला वेगळी खोली घेऊन दिली असल्याचा दावाही केला. जसविंदर सिंहने काला संधूला फोन करून पत्नीला परत पाठव अशी विनंती केली होती. मुले अनाथांसारखी राहत असल्याचंही म्हटलं होतं. त्यावर संधूने शिवीगाळ केली असल्याचा आरोपही करण्यात आला. जसविंदर सिंहची पत्नी गेल्या तीन वर्षांपासून काला संधूसोबत राहत होती.
संबंधित बातम्या