मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Monkeypox Virus: कोरोनानंतर आता मंकीपॉक्सची एन्ट्री, WHO बोलावणार आपत्कालीन बैठक

Monkeypox Virus: कोरोनानंतर आता मंकीपॉक्सची एन्ट्री, WHO बोलावणार आपत्कालीन बैठक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 20, 2022 06:44 PM IST

डब्ल्यूएचओच्याबैठकीतविषाणूचा प्रसार होण्याची पद्धत,गेआणि बायसेक्शुअल पुरुषांध्ये याचा अधिक प्रसार होण्याबरोबरच लसीकरणाच्या स्थितीवरही चर्चा केली जाऊ शकते.

मंकीपॉक्स
मंकीपॉक्स

कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून अजूनही जनजीवन पूर्ववत सुरु झाले नसताना आता धोकादायक मंकीपॉक्स आढळून आल्याने आरोग्य व्यवस्थेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्स व्हायरसला गांभीयाने घेत तज्ज्ञांची एक आपत्कालीन बैठक बोलावण्याबाबत विचार करत आहे. सांगितले जात आहे की, डब्ल्यूएचओच्या बैठकीत विषाणूचा प्रसार होण्याची पद्धत, गे आणि बायसेक्शुअल पुरुषांध्ये याचा अधिक प्रसार होण्याबरोबरच लसीकरणाच्या स्थितीवरही चर्चा केली जाऊ शकते. 

मे महिन्याच्या सुरुवातीपासून यूनायटेड किंगडम,  स्पेन, बेल्जियम,  इटली,  ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासह जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे समोर आली आहेत. ब्रिटनच्या आरोग्य विभागानुसार, नुकतीच नायजेरियाहून आलेल्या एक नागरिकाला इंग्लंडमध्ये मंकीपॉक्सची लागण झाल्याचे प्रकरण ७ मे रोजी समोर आले होते.

१८ मे रोजी यूएस मॅसाचुसेट्स डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थने कॅनडा देशातून आलेल्या एका पुरुषाला मंकीपॉक्स विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट केले होते. मात्र जनतेमध्ये अजून याचा प्रसार झाला नसून रुग्णावर उपचार सुरू आहेत. 

मंकीपॉक्स एक दुर्मिळ मात्र धोकादायक आजार आहे. सुरुवातीला संक्रमित रुग्णाला ताप येतो त्यानंतर लिम्फ नोड्स सुजल्यासारखे दिसतात. या आजाराने चेहरा आणि शरीरावर गाठी येतात. हा आजार २ ते ४ आठवड्यात पूर्ण बरा होता. दरम्यान या विषाणूचा प्रसार लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात होत नाही. 

ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्समध्ये मंकीपॉक्स व्हायरसच्या पहिल्या दोन प्रकरणांचा खुलासा झाला आहे. तर पेरूमध्ये याबाबत अलर्ट केला आहे. ऑस्टेलियातील राज्य न्यू साउथ वेल्समध्ये शुक्रवारी मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. त्याचा प्रसार हळू-हळू यूरोपमध्ये होत आहे. 

काय आहेत मंकीपॉक्स रोगाची लक्षणं?

१. स्नायूंमध्ये वेदना आणि थंडी वाजून येणं

२. सातत्यानं थकवा जाववणं

३. तीव्र ताप आणि न्यूमोनिया होणं

४. शरीरावर गडद लाल ठिपके येणं

५. डोकेदुखीचा त्रास होणं

IPL_Entry_Point