US School Shooting : अमेरिकेत वाढत्या गोळीबाराचा घटनेमुळे चिंता वाढली आहे. सातत्याने या घटना देशात घडत आहेत. अशीच एक घटना पुन्हा पुढे आली आहे. ही घटना अमेरिकेच्या नॅशविल शहरातील एका खासगी ख्रिश्चन शाळेत घडली आहे. एका महिला हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला असून या घटनेत ३ विद्यार्थी आणि सात जन ठार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस देखील दाखल झाले असून हल्लेखोर महिला आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत महिलेला पोलिसांनी ठार मारले आहे.
अमेरिकेतील नॅशव्हिल शहरातील एका खासगी ख्रिश्चन शाळेत हा गोळीबार झाला. सोमवारी सकाळी ही घटना घडली. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर एक महिला असून पोलिसांनी तिला ठार केलं आहे. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळावरील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण यातील तीन विद्यार्थी आणि सात नागरिकांना त्यांनी मृत घोषित केले. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये हा हल्ला झाला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एका शाळेत महिलेने अंदाधुंद गोळीबार केला असल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. यावेळी हल्लेखोर महिलेने पोलिसांवर देखील गोळीबार केला. दरम्यान, पोलिसांनी या महिलेला चकमकीत ठार मारले. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मनरो कॅरेल ज्युनियर चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता .
ही महिला हल्लेखोर शाळेच्या दरवाजातून इमारतीत घुसली. येथून ती पळून जाण्याच्या तयारीत होती. दरम्यान, ती चर्चच्या दुसऱ्या मजल्यावर पोलिसांपुढे आली. यावेळी तिने पोलिसांवर देखील हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील गोळीबार करत हल्लेखोर महिलेला ठार मारले. दरम्यान, शाळा प्रशासाने इतर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पोलीस संरक्षणात सुरक्षित स्थळी नेले.