मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Union Budget 2023 : तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या यंदाच्या बजेटमधील मोठ्या घोषणा

Union Budget 2023 : तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या यंदाच्या बजेटमधील मोठ्या घोषणा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 01, 2023 02:47 PM IST

Nirmala Sitharaman Union Budget 2023-24 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या.

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman

Big announcement in Union Budget 2023-24 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. देशाची अर्थव्यवस्था जोमानं वाटचाल करेल असा विश्वास व्यक्त करतानाच सीतारामन यांनी आर्थिक आघाडीवर सरकारनं आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा पाढा संसदेत वाचला. २०२३-२४ चं बजेट सादर करताना त्यांनी सर्वसामान्यांवर थेट परिणाम करतील, अशा काही घोषणा केल्या.

अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा:

  • केंद्र सरकारची मोठी घोषणा; सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
  • सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकार होणार. पीएम आवास योजनेवरील तरतुदीत ७९ हजार कोटींपर्यंत वाढ
  • पॅनकार्ड ओळखपत्र (KYC) म्हणून वापरता येणार.
  • रेल्वेसाठी २.४ लाख कोटींची विक्रमी तरतूद. आतापर्यंतची सर्वात मोठी तरतूद
  • मोबाइल पार्ट्सच्या आयातीवरील सीमा शुल्कातील सवलतीला एक वर्षाची मुदतवाढ
  • ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवीवरील कमाल मर्यादेत ३० लाखांपर्यंत वाढ

Union Budget 2023 : एकलव्य शाळांसाठी केंद्र सरकार ३८,८०० शिक्षकांची भरती करणार

  • मासिक उत्पन्न योजनेच्या मर्यादेत वाढ.
  • हवाई वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी देशातील ५० एअरपोर्ट्स, हेलिपोर्ट्स, वॉटर एअरो ड्रोन्स, अद्ययावत लँडिंग ग्राउंड्सचं पुनरुज्जीवन करणार
  • शहरी पायाभूत विकासावर दर वर्षाला १० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार
  • लहान मुले तसंच किशोरवयीन मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी उभारली जाणार
  • राज्य सरकारांना ५० वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या व्याजमुक्त कर्ज योजनेला एक वर्षाची मुदतवाढ

Union Budget
Union Budget
IPL_Entry_Point