मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vikram S Kirloskar : टोयोटा इंडियाचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे हृदयविकाराने बंगळुरू येथे निधन

Vikram S Kirloskar : टोयोटा इंडियाचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे हृदयविकाराने बंगळुरू येथे निधन

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 30, 2022 09:14 AM IST

Toyota India Vice Chairman Vikram S Kirloskar dies of heart attack in Bengaluru : टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेटचे उपाध्यक्ष आणि भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगातील सर्वात मोठे व्यक्तिमत्व असलेले विक्रम एस. किर्लोस्कर यांचे मंगळवारी बेंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने ६४ व्या वर्षी निधन झाले.

टोयोटा इंडियाचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर
टोयोटा इंडियाचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर

Toyota India Vice Chairman Vikram S Kirloskar dies of heart attack in Bengaluru : टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगातील सर्वात मोठे व्यक्तिमत्व असलेले विक्रम एस. किर्लोस्कर यांचे मंगळवारी बेंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने ६४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनासंदर्भात कंपनीने ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १ वाजता बेंगळुरू येथील हेब्बल स्मशानभूमी येथे अंतिम श्रद्धांजली देत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.

मंगळवारी टोयोटा इंडियाने त्यांच्या निधनासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली. मंगळवारी (दि २९) टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस. किर्लोस्कर यांचे हृदय विकाराने अकाली निधन झाल्याची माहिती देताना आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना, असे ट्विट कंपनीने केले आहे.

 

बंगळुरू-मुख्यालय असलेल्या बायोफार्मास्युटिकल्स कंपनी बायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष किरण मुझुमदार-शॉ यांनी देखील ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. शॉ म्हणाले, “विक्रमच्या निधनाची बातमी कळल्याने धक्का बसला आहे. तो माझा प्रिय मित्र होता. त्याची आठवण सदैव स्मरणात राहीन. मी गीतांजली, मानसी आणि कुटुंबाच्या वेदना आणि असह्य दु:खात सहभागी आहे.”

विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्करग्रुपचे चवथ्या पिढीतील प्रमुख होते. किर्लोस्कर सिस्टिम लिमिटेडचे ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेड चे ते उपाध्यक्ष होते. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये मॅसाच्युसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी येथून ग्रॅजुएट झाले. ते भारतीय आटोमोबाईल क्षेत्रातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व होते. तसेच सीआयआय, एसआयएएम आणि एआरएआय या संस्थांमध्ये देखील त्यांनी महत्वाची पदे भूषावली आहेत.

IPL_Entry_Point

विभाग