मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  TikTok Fires India Employees: टिकटॉकने सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, सांगितले 'हे' कारण

TikTok Fires India Employees: टिकटॉकने सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, सांगितले 'हे' कारण

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 10, 2023 03:11 PM IST

TikTok News: प्रसिद्ध शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकने सर्व ४० भारतीय कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.

TikTok News
TikTok News

TikTok: आर्थिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर दिग्गज कंपनीने नोकर कपात सुरू केली आहे. गूगल, फेसबूक, इन्स्टाग्राम,अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, सॅप, डिज्नी कंपनीने नोकर कपात केल्यानंतर आता शॉर्ट व्हिडिओ अॅप टीकटॉकने सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. टिकटॉक कंपनी भारतातील संपूर्ण टीम बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असून ४० कर्मचाऱ्यांना नारळ दिला. कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांचा पगार दिला जाणार आहेत. २८ फेब्रुवारी कर्मचाऱ्यांचा कामाचा शेवटचा दिवस असेल.

भार सरकारने २०२० मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव चीनी अॅपवर बंदी घातली होती. टिकटॉकसारखे अॅप देशाच्या सुरक्षेसाठी धोक्याचे होते. त्यामुळे केंद्र सरकारने टीकटॉकवरही ॲप्सवर बंदी घातली. तेव्हापासून भारतात टीकटॉक सुरु झाले नाही. भारतात टिकटॉक पुन्हा लाँच होण्याची शक्यता नसल्याने कंपनीने सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताने जुलै २०२० मध्ये ५९ अॅप्सवर बंदी घातली होती. भारताने वुई मेट, शेअर इट, युसी ब्राउजर्स, क्लब फॅट्री, युसी न्यूज, झेंडर, लाइक, सीएम ब्राउजर्स, शीन, न्यूजडॉग, वंडर कॅमेरा, कॅम स्कॅनर, क्लिन मास्टर-चिता मोबाइल, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, स्वीट सेल्फी, हेलो, यू व्हिडिओ, मोबाइल लेजंड्स अशा एकूण ५९ अॅप्सवर बंदी घातली.

IPL_Entry_Point

विभाग