मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सार्वजनिक ठिकाणी लघवी, घाण करू नये म्हणून देवदेवतांचे फोटो लावावेत का? हायकोर्ट म्हणाले..

सार्वजनिक ठिकाणी लघवी, घाण करू नये म्हणून देवदेवतांचे फोटो लावावेत का? हायकोर्ट म्हणाले..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 19, 2022 10:23 PM IST

High Court on Urinating in public places: सार्वजनिक ठिकाणी लोकांनी लघवी करू नये, घाण करू नये यासाठी देवदेवांचे फोटो लावले जातात. हे बंद करावे अशा मागणीची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर दिल्ली न्यायालयाने म्हत्वाचा निकाल दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालय
दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली– परदेशात सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास किंवा रस्त्यावर थुंकल्यास जबर दंड आकरला जातो. त्याबरोबरच तेथील लोकांमध्येही एक शिस्त पाहायला मिळते. आपल्या देशात  सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करणे ही मोठी समस्या आहे. कितीही कायदे आणि कठोर नियम केले तरी यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. यावर उपाय म्हणून जेणे घाण केली जाते किंवा कचरा टाकला जातो तेथे देवदेवतांचे छायाचित्रे लावली जातात. मात्र, यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, थुंकणे किंवा कचरा फेकण्यापासून रोखण्यासाठी भिंतींवर देव-देवतांची चित्रे चिकटवण्याचा उपाय बंद करण्याबाबतची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. यापूर्वीच्या सुनावणीत दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता.

सार्वजनिक ठिकाणी लघवी, थुंकणे किंवा कचरा फेकण्यापासून रोखण्यासाठी भिंतीवर पवित्र प्रतिमा लावणे हे भारतीय दंड संहितेच्या कलम-२९५ आणि २९५ अ चे उल्लंघन आहे, कारण त्यामुळे सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्या जातात, असे याचिकेत म्हटले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे की, लोकांना सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, थुंकणे आणि कचरा फेकणे यापासून रोखण्यासाठी देवदेवतांची चित्रे भिंतीवर लावली जातात, ही प्रथा रूढ झाली आहे. मात्र याचा लोकांवर शुन्य परिणाम दिसून येतो. उलट लोक सार्वजनिक ठिकाणी या पवित्र प्रतिमांवर लघवी करतात किंवा थुंकतात. 

याचिकाकर्ते आणि अधिवक्ता गौरांग गुप्ता म्हणाले, की हा उपाय पवित्र फोटोंच्या पावित्र्याचे उल्लंघन करणारा आहे. लोकांना चुकीच्या सवयींपासून परावृत्त करण्यासाठी त्यांना देवतांच्या नावाने भीती घालण्याचा हा प्रकार आहे. एखाद्याच्या धर्माची श्रद्धा व भावना विचारात घेऊन असे फोटो लावण्यास बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

IPL_Entry_Point

विभाग