मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sonia Gandhi : देशाच्या न्यायव्यवस्थेवर मंत्र्याकडून सुनियोजित पद्धतीने हल्लेः सोनिया गांधी

Sonia Gandhi : देशाच्या न्यायव्यवस्थेवर मंत्र्याकडून सुनियोजित पद्धतीने हल्लेः सोनिया गांधी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 21, 2022 12:30 PM IST

Sonia Gandhi : देशाच्या न्यायव्यवस्थेवर आज सुनियोजित पद्धतीने हल्ले चढवले जात असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.

Sonia Gandhi
Sonia Gandhi

दिल्ली : देशाच्या न्यायव्यवस्थेवर आज सुनियोजित पद्धतीने हल्ले चढवले जात आहेत. या साठी केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक न्यायव्यवस्थेवर हल्ला करणारी विधाने करण्यासाठी नियुक्त करण्यात आले असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.

दिल्ली येथे काँग्रेस संसदीय पक्षाला कार्यकारिणीची बैठीक पार पडली. या बैतहिकिला संबोधित करताना कॉँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांनी केंद्र सरकरवर टीका केली आहे. संसदेत काँग्रेस संसदीय पक्षाला (सीपीपी) संबोधित करताना गांधी म्हणाल्या की, चीनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या संदर्भात संसदेत चर्चेला भाजपने नकार दिला. हा नकार म्हणजे लोकशाहीबद्दलचा अनादर दाखवत असून सरकारचे वाईट हेतु देखील यातून पुढे येतात.

सोनिया गांधी म्हणाल्या, न्यायव्यवस्थेवर हल्ला करणारी भाषणे करण्यासाठी मंत्री – आणि अगदी उच्च घटनात्मक अधिकार्‍यांची नेमणूक सरकारतर्फे करण्यात आली आहे. हा न्यायपाकीका सुधारण्याचा सरकारचा प्रयत्न नाही तर त्याऐवजी, जनतेच्या नजरेत न्यायपालिके बद्दलची आस्था कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच्या पहिल्याच सीपीपीच्या बैठकीत सोनिया गांधींनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापनावर आणि महागाई आणि बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर टीका केली. गांधी म्हणाल्या, भारतासमोर महत्त्वपूर्ण अंतर्गत आणि बाह्य आव्हाने आहेत. महागाई, बेरोजगारी, सामाजिक ध्रुवीकरण, लोकशाही संस्था कमकुवत होणे आणि वारंवार सीमेवरील घुसखोरी हे गंभीर प्रश्न आज देशासमोर आहेत. चीनच्या घुसखोरीवर संसदेत चर्चा होऊ न देणे हे लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे. संपूर्ण देश हा दक्ष सैनिकांच्या पाठीशी उभा आहे, ज्यांनी कठीण परिस्थितीत चीनी सैनिकांचे हल्ले परतवून लावले. सरकार मात्र या विषयावर संसदेत चर्चा होऊ देण्यास हट्टीपणाने नकार देत आहे. एखाद्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आव्हानाचा सामना करताना, संसदेला विश्वासात घेण्याची आपल्या देशातील परंपरा आहे. वादविवाद अनेक गंभीर प्रश्नांवर प्रकाश टाकू शकतो. चीन आपल्यावर सतत हल्ले करण्याचे धाडस का करत आहे? हे हल्ले परतवून लावण्यासाठी कोणती तयारी करण्यात आली आहे आणि आणखी काय करण्याची गरज आहे? चीनला भविष्यातील घुसखोरीपासून रोखण्यासाठी सरकारचे धोरण काय आहे? चीनबरोबर आपली व्यापार तूट कायम आहे, आपण निर्यातीपेक्षा कितीतरी अधिक आयात करतो, हे लक्षात घेता, चीनच्या लष्करी शत्रुत्वाला त्यांची आर्थिक कोंडी करून उत्तरे का दिली जात नाही असा सवाल देखील सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला या बैठकीत विचारला आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग