मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mohan Bhagwat : वाढत्या महागाईवरून मोहन भागवतांचा मोदी सरकारला टोला, म्हणाले...

Mohan Bhagwat : वाढत्या महागाईवरून मोहन भागवतांचा मोदी सरकारला टोला, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 06, 2023 01:57 PM IST

Mohan Bhagwat On Inflation : इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतात बेरोजगारीचं प्रमाण कमी होतं, असंही सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

Mohan Bhagwat On Modi Govt
Mohan Bhagwat On Modi Govt (Snehal Sontakke)

Mohan Bhagwat On Modi Govt : गेल्या काही वर्षांपासून भारतात वाढलेल्या महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारला चांगलंच घेरलेलं असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महागाईच्या मुद्द्यावर नाव न घेता मोदी सरकारला जोरदार टोला हाणला आहे. भारतात वैद्यकीय शिक्षण आणि उपचार महाग होत चालल्याचं सांगत भागवत यांनी यात सुधारणा होण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आता संघानेच महागाईच्या मुद्द्यावर भाष्य केल्यामुळं केंद्रातील मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हरयाणातील उंड्री-कर्नाल रोडवरील एका रुग्णालयाचं उद्घाटनानंतर केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थितांशी बोलताना म्हणाले की, देशातील सर्व नागरिकांसाठी वैद्यकीय उपचार आणि शिक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु आता उपचार आणि वैद्यकीय शिक्षण या गोष्टी फार महाग होत चालल्या आहेत. सर्वसामान्य लोकांना स्वस्तात उपचार आणि शिक्षण मिळण्याची गरज असून त्यात बदल होण्याची आवश्यकता असल्याचं सांगत मोहन भागवत यांनी नाव न घेता केंद्रातील मोदी सरकारला जोरदार टोला हाणला आहे.

भारतातील शिक्षणाची व्यवस्था ही फक्त रोजगारासाठीच नाहीये. ते ज्ञानाचं माध्यम असल्यामुळं त्यातून सर्वांना स्वस्तात शिक्षण उपलब्ध होत असतं. शिक्षणाचा खर्च समाजानं उचलल्यानंतर शिक्षण घेत अनेक कलाकार आणि विद्वान मंडळींनी जगभरात आपली ओळख निर्माण केली, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. भारतात ब्रिटिश राजवट लागू होण्यापूर्वी तब्बल ७० टक्के लोकसंख्या सुशिक्षित होती. त्यावेळी इंग्लंडमध्ये केवळ १७ टक्के लोकच शिक्षित होते. त्यावेळी भारतात बेरोजगारीचा दरही कमी होता. ब्रिटिशांनी त्यांची शिक्षणपद्धती भारतात लागू केली. त्यानंतर ब्रिटिश ७० टक्के आणि आपण १७ टक्के सुशिक्षित राहिलो, असंही सरसंघचालक मोहन भागवत यांनी कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

IPL_Entry_Point