दोन आठवड्यांपूर्वी शेअर मार्केटचे बिगबुल राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं. जवळपास ३० हजार कोटी रुपयांहून जास्त मालमत्तेचे मालक असणाऱ्या झुनझुनवाला यांच्यानंतर ही संपत्ती कुणाकडे जाणार? यासंदर्भात राकेश झुनझुनवाला यांनी एक मृत्यूपत्र तयार केलं होतं. त्यात राकेश झुनझुनवाला यांनी त्यांचे शेअर्स इतर मालमत्ता ही पत्नीसह तीन मुलांना देण्याची व्यवस्था केली आहे. आता याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर मार्केटमधील त्यांची मालमत्ता ही पत्नी आणि तीन मुलांना दिली जाईल. तेच झुनझुनवालांच्या मालमत्तेचे वारस असतील.
झुनझुनला यांना तीन मुले आहेत. यात १८ वर्षांची मुलगी निष्ठा, तर आर्यमन आणि आर्यवीर ही जुळी मुले आहेत. या तिघांशिवाय झुनझुनवाला हे दातृत्वाला अपत्य मानत होते. त्यांच्या संपत्तीतील काही वाटा हा धर्मादाय संस्थेला दिला जाण्याची शक्यताही आहे. यांच्यासह झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यासुद्धा मोठ्या संपत्तीच्या मालक असणार आहेत.
झुनझुनवालांनी तयार केलेल्या मृत्यूपत्राचे वाचन सर्व हिंदू विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत केले जाणार आहेत. मृत्यूपत्र तयार करण्यासाठी तसंच ते कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठी झुनझुनवाला यांचे सहकारी राहिलेल्या बर्जिस देसाई यांच्यावर जबाबदारी आहे. गेल्या २५ वर्षांपासून ते झुनझुनवाला यांना ओलखतात. तसंच झुनझुनवाला यांच्या नव्या अकासा एअर या प्रकल्पाचे ते सहसंचालकसुद्धा आहेत.
राकेश झुनझुनवाला यांची लिस्टेड प्रॉपर्टी ही जवळपास ३० हजार कोटी रुपयांची आहे. यासिवाय त्यांची स्थावर मालमत्ता मलबार हिल इथं समुद्रासमोरील आलिशान वास्तू, २०१३ मध्ये ही वास्तू स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून १७६ कोटी रुपयांना खरेदी केली होती. तसंच त्यांच्या लोणावळ्यातील हॉलिडे होमचा समावेश आहे.
राधाकिशन दमानी मुख्य विश्वस्त
राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर त्यांच्या ट्रस्टची जबाबदारी झुनझुनवालांचे खास मित्र आणि गुंतवणूकदार राधाकिशन दमानी हे सांभाळणार आहेत. ते राकेश झुनझुनवालांच्या ट्रस्टचे मुख्य विश्वस्त बनले आहेत. त्यांच्याशिवाय कल्पराज धारांशी आणि अमल पारीख हे दोन विश्वस्त आहे. तर रेअर एंटरप्रायजेसचं व्यवस्थापन उत्पल सेठ आणि अमित गोएला सांभाळतील. याशिवाय झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा यांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे.
संबंधित बातम्या