मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rajasthan political crisis : सचिन पायलट यांना ‘टेकऑफ’ करण्याचा सिग्नल? म्हणाले आता फोकस राजस्थान

Rajasthan political crisis : सचिन पायलट यांना ‘टेकऑफ’ करण्याचा सिग्नल? म्हणाले आता फोकस राजस्थान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jul 24, 2023 06:03 PM IST

सचिन पायलट(sachin pilot) आणि सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांच्यात १०जनपथवर बैठक झाली. बैठकीनंतर सचिन पायलटयांनी म्हटले की, त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे आपली बाजू मांडली आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, त्यांचा फोकसराजस्थानच राहील.

सचिन पायलट यांना ‘टेकऑफ’ करण्याचा सिग्नल?
सचिन पायलट यांना ‘टेकऑफ’ करण्याचा सिग्नल?

Rajasthan political crisis : राजस्थान काँग्रेसमध्ये प्रचंड उलथापालथ माजली असताना आज दिल्लीत वेगवान घडामोडी घडल्या. या प्रकरणी सचिन पायलट(sachin pilot) आणि सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांच्यात १० जनपथवर बैठक झाली. बैठकीनंतर सचिन पायलट यांनी म्हटले की, त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे आपली बाजू मांडली आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, त्यांचा फोकस राजस्थानच राहील. पायलट यांनी २०२३ निवडणुकीत कठोर मेहनत करून विजय मिळवण्याचा विश्वासही व्यक्त केला. यामुळे अनुमान लावले जात आहेत की, सचिन पायलट यांना टेकऑफचे संकेत मिळाले आहेत.

२०२३ निवडणुकीत कठोरमेहनत करावी लागेल -
सचिन पायलट आणि सोनिया गांधी यांच्यात १० जनपथवर जवळपास एक तास बैठक झाली. त्यानंतर सचिन पायलट यांनी माध्यमाशी बोलताना बैठकीत काय चर्चा झाली हे सांगितले नाही, मात्र राजस्थानवर फोकस करण्याचे म्हणत मोठा संकेत दिला. सचिन पायलटयांनी म्हटले की, आज काँग्रेस अध्यक्षा सोनियांशी चर्चा केली. त्यांनी माझी बाजू ऐकून घेतली. आमच्यात जयपूरमध्ये जे काही घडले त्यावर सविस्तर चर्चा केली.

सोनियागांधी घेणा निर्णय-
सचिन पायलटयांनी म्हटले की,राजस्थानबाबत संपूर्ण निर्णय सोनिया गांधी घेणार आहेत. मला विश्वास आहे की, येत्या १२ ते १३ महिन्यात आम्ही कठोर मेहनत करूनराजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यात यशस्वी होऊ.सचिन पायलटयांनी म्हटले की, सध्या राजस्थानमधील २०२३ मधील निवडणुका जिंकणे लश्र आहे. यासाठी आम्हाला मतभेद विसरून काम करावे लागणार आहे.

गहलोतयांच्या हातातून डाव निसटला?
यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. भेटीनंतर अशोक गहलोत म्हणाले की, ते अध्यपदाची निवडणूक लढवणार नाहीत. यामुळेस्पष्ट होते की, त्यांच्या हातातून बाजी निसटली आहे. काँग्रेस अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची घोषणा गहलोत यांनी केली होती. त्यानंतर पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी एक निवदेन जारी केले की, सोनिया गांधी पुढच्या ४८ तासात राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय घेतली. यामुळे चित्र खूप स्पष्ट झाले आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या