मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Science Breaking: चंद्रावरून आणलेल्या मातीत उगवलं रोपटं, कसा झाला चमत्कार? वाचा!
Moon Soil Grown Plants In US
Moon Soil Grown Plants In US (HT)

Science Breaking: चंद्रावरून आणलेल्या मातीत उगवलं रोपटं, कसा झाला चमत्कार? वाचा!

14 May 2022, 15:15 ISTAtik Sikandar Shaikh

चंद्रावरील वातावरण कसं आहे किंवा तिथं हवा अथवा पाणी आहे का, याचा शोध आतापर्यंत विविध देशांतील शास्त्राज्ञांनी केलेला आहे. परंतु आता अमेरिकेतील शास्त्राज्ञांच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे.

Moon Soil Grown Plants In US : सजीवांना भूतलावर राहण्यासाठी पाण्याची आणि ऑक्सिजनची नितांत गरज असते. गेल्या काही शतकांपासून सूर्यमालेतील विविध ग्रहांवर पाण्याचा आणि ऑक्सिजनचा शोध घेण्याचं काम विविध देशांनी केलेलं आहे. याशिवाय पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावरील वातावरण कसं आहे, याबाबतही भारतासह अनेक देशांनी तिथं मोहिमा पूर्ण केलेल्या आहेत. चंद्रावर मोहिम करण्यात नेहमीच अमेरिका आणि रशिया हे दोन देश पुढे राहिलेले आहेत. विविद देशांच्या चंद्रमोहिमांच्या माध्यमातून प्रत्येक देशानं चंद्रावरील वातावरण आणि तिथं मानवी वस्ती होऊ शकते का, याचा अभ्यास केलेला आहे. परंतु आता अमेरिकेतील काही शास्त्राज्ञांनी चक्क चंद्रावरुन आणलेल्या मातीत रोपटं उगवून दाखवलं आहे. अमेरिकेतल्या फ्लोरिडा विद्यापीठातल्या काही शास्त्रज्ञांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळं नासासह जगभरातील अंतराळ संस्थांसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काही वर्षांपूर्वी अमेरिकेची प्रसिद्ध अंतराळ संस्था असलेल्या नासाने अपोलो मोहिमेअंतर्गत चंद्रावरुन माती आणली होती. याशिवाय शास्त्रज्ञांनी चंद्रावरुन ३८२ किलो वजनाचे दगडही आणले होते. चंद्रावरुन आणलेल्या मातीत रोपटं उगवल्यानं आता तिथं मानली वस्ती होऊ शकणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता वाढली आहे. ऑपरेशन अपोलोच्या माध्यमातून चंद्रावरुन आणलेल्या मातीपैकी नासाकडून आम्हाला फक्त १२ ग्रॅम माती मिळाली, इतक्या कमी मातीत रोपटं उगवणं ही फार अवघड गोष्ट होती, परंतु आता आम्हाला या शोधात मोठं यश मिळाल्याची माहिती फ्लोरिडा विद्यापीठाचे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ रॉबर्ट फेरी यांनी दिली आहे.

कसा केला प्रयोग?

चंद्रावरुन आणलेल्या मातीला शास्त्रज्ञांच्या भाषेत रेगोलिथ असं म्हटलं जातं. या मातील चार वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित करुन शास्त्रज्ञांनी त्यात द्रवपदार्थ मिसळले. त्यानंतर काही दिवसांनी शास्त्रज्ञांनी त्यात ऑर्बिडोप्सीसच्या बीयांची लागण केली. त्यानंतर काही दिवसांतच त्यात लहान रोपटं उगवलं. त्यामुळं शास्त्राज्ञांचं हे अंतराळशास्त्रात मोठं यश मानलं जात आहे. चंद्रावरुन आणलेल्या या मातील उगवण्यात आलेल्या रोपट्याविषयीची संपूर्ण माहिती ही 'जर्नल ऑफ कम्यूनिकेशन्स बायोलॉजी'मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

त्यामुळं आता गेल्या काही शतकांपासून चंद्रावर सुरु असलेल्या मानवी मोहिमांतला हा नवा शोध मानला जात आहे. जर चंद्रावरुन आणलेल्या मातीत जर रोपटं येत असेल तर तिथं पाणी आणि ऑक्सिजन असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)