मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pariksha Pe Charcha : विद्यार्थ्यांच्या 'त्या' प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी घेतली विरोधकांची 'शाळा

Pariksha Pe Charcha : विद्यार्थ्यांच्या 'त्या' प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी घेतली विरोधकांची 'शाळा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 27, 2023 06:04 PM IST

Narendra Modi in Pariksha Pe Charcha 2023 : 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना विरोधकांची शाळा घेतली.

PM Narendra Modi
PM Narendra Modi (PTI)

Narendra Modi in Pariksha Pe Charcha 2023 : विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला 'परीक्षा पे चर्चा' हा उपक्रम आज पार पडला. दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी पंतप्रधान मोदी यांना काही राजकीय प्रश्नही विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तरं दिली.

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदी यांना एक वेगळा प्रश्न विचारला. टीकेला कसं सामोरं जायचं असा तो प्रश्न होता. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला हाणला. समृद्ध लोकशाहीत टीका हा एक शुद्धीयज्ञ आहे, असं मानणाऱ्यांपैकी मी आहे, असं ते म्हणाले.

‘अनेकदा टीका करणारे सवयीमुळं तसं करत असतात. मात्र, घरात होणारी टीका ही आपल्या फायद्याची असते. त्यातून आपल्याला शिकायला मिळतं, असं ते म्हणाले. 'राजकारणात काहीसं वेगळं असतं. विरोधी पक्षातील लोक माइंड गेम खेळत असतात. आपण आपलं काम सोडून त्यांच्या टीकेला उत्तर द्यावं असा त्यांचा प्रयत्न असतो. अनेकदा तसं होतंही. पण ते टाळलं पाहिजे. आपण केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असा सल्ला मोदींनी दिला.

‘खरंतर टीका किंवा समीक्षा ही खूप कठीण गोष्ट आहे. मात्र, ती जमत नसल्यानं लोक शॉर्टकट वापरतात आणि बिनबुडाचे आरोप करू लागतात. दोन्हीमध्ये खूप फरक असतो. आपण टीका ही आपल्या हिताची आहे असं समजून आरोपांकडं दुर्लक्ष करायला हवं,’ असं मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.

IPL_Entry_Point

विभाग