मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pakistan : पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर बलुच बंडखोरांनी पाडले; दोन मेजरसह ६ सैनिक ठार

Pakistan : पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर बलुच बंडखोरांनी पाडले; दोन मेजरसह ६ सैनिक ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 26, 2022 12:57 PM IST

Pakistan Army Helicopter Crash : पाकिस्तान लष्कराचे एक हेलिकॉप्टर बलुच बंडखोरांनी पाडले. या हल्ल्यात पाकिस्तान लष्करातील दोन मेजर दर्जाचे अधिकारी आणि ६ सैनिक ठार झाले आहेत. सोमवारी सकाळी बलूचिस्तानच्या हरनाई परिसरात हा हल्ला करण्यात आला.

पाकिस्तान लष्कराचे प्रमुख जलरल बावेजा
पाकिस्तान लष्कराचे प्रमुख जलरल बावेजा

पाकिस्तान लष्कराच्या दोन मेजर दर्जाचे अधिकारी तसेच ६ सैनिक एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत ठार झाले आहेत. सोमवारी सकाळी बलूचिस्तानच्या हरनाई प्रांतात हा अपघात झाला. पाकिस्तान लष्कराचा माध्यम विभाग डीजी आयएसपीआरने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ठार झालेल्यांमध्ये दोन पायलटचा देखील समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत बलूचिस्तानमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होण्याची ही दुसरी घटना आहे. या पूर्वी ऑगस्ट महिन्यात अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी या हल्ल्याची जबाबदारी ही बलूचिस्तान लिब्रेशन संघटनेने घेतली होती. त्यामुळे या दुर्घटनेमागे देखील बलुचिस्थान लिब्रेशन संघटनेचा हात असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेबाबत पाकिस्तानच्या लष्कराने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, या दुर्घटनेचा तपास उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून केला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या पूर्वी १ ऑगस्ट रोजी बलूचिस्तानमध्येच बंडखोरांच्या परिसरात पाकिस्तान लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. यात लेफ्टनंट जनरल सरफराज अली आणि ६ अधिकारी ठार झाले होते. बलूचिस्तानच्या लासबेला जिल्ह्यात हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. सुरवातीला हा अपघात असल्याचे बोलले जात होते. मात्र, दुसऱ्या दिवशी बलुच बंडखोरांनी हे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला होता.

यामुळे या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे देखील बलुच लिब्रेशन संघटनेचा हात असल्याचे बोलले जात आहे. सध्या पाक सेनेने कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळले आहे. या घटनेची चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे. पाक लष्कराने म्हटले आहे की, इंजीनियर्स यांनी केलेल्या तपासानंतर या आपघता मागचे कारण समजणार आहे. पाकिस्तानचे विरोधी पक्षनेता फवाद चौधरी या अपघाता बद्दल म्हणाले, पाक लष्करातील हेलिकॉप्टचे उड्डाण हे धोकादायक होत आहेत. अभियंते आणि अधिकारी या अपघाताची चौकशी करणार आहेत. यानंतरच हेलिकॉप्टर मधील त्रुटींमुले अपघात झाला की हल्ल्यामुळे हा अपघात झाला हे कळू शकणार आहे. अपघातात ठार झालेले सर्व अधिकारी हे तरुण होते, यामुळे पाकिस्तान लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग